शिवजयंती विशेष – मला कळालेले शिवाजी महाराज ..

जाणता राजा, रयतेचा राजा इ.अनेक उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात.शिवजयंती च्या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीने त्यांच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांना “मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज” यावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातल्या निवडक  प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय…

मला कळलेलं शिवाजी महाराज म्हणजे द मॅनेजमेंट गुरू. मॅनेजमेंट कशी असावी आणि कश्या पध्दतीने हाताळावी हे समजून घ्यायचं असेल तर महाराजांना नीट समजून घेऊन त्यांच्या अभ्यास केला तर अनेक घटक कळू शकतात.-शोभिका नकाशे,भाऊसाहेब हिरे विद्यालयमाझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शूर-पराक्रमी वीर-पुत्र. साहस, धाडस आणि नियोजन व नेतृत्व गुण मला शिवाजी महाराजांच्या अनेक कथांमधून वाचायला मिळाले . रयतेच्या सुखासाठी धडपड करणारे, अन्यायाच्या विरोध नेहमी उभे राहणारे, संस्कारी पुत्र म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शिवबा.-रितिका यादव,अनुयोग विद्यालयछत्रपती शिवाजी महाराज खूप धाडसी होते. मला त्यांच्या विषयी आदर वाटतो. शिवाजी महाराज्यांच्या सैन्यात सर्व धर्म-पंथ व  जातीचे मावळे होते. त्यांनी कोणत्याही जातीचा भेदभाव केला नाही. शिवाजी महाराज हिंदू असून ही त्यांनी कधी ही मुस्लिमांचा दुजाभाव केला नाही. त्यांनी स्वत: गड बांधले व काही गड जिंकण्यासाठी खुप लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर  अत्याचार   करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. -प्रनिता बोले,एन.एम. जाशी शाळा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल कि आठवते स्वराज्य. शिवाजी महाराज्यांचे मावळे आणि त्यांचे प्रेम इतिहासाच्या पुस्तकांतून वाचलेल्या त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आठवतात व नेहमी त्या नेहमी प्रेरणा देतात.-सुजल जाधव. ,अनुयोग इंग्लिश माध्यम शाळामला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा साम्राज्याचे संस्थापक, विचारांनी श्रीमंत व योगी असणारे व्यक्तिमत्त्व .  रयतेच्या भल्याचं ज्यांना कळलं ते म्हणजे महाराज, स्वतःचे अस्तित्व  स्वबळावर ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे शिवाजी महाराज व तुम्हा-आम्हाला दिशा देणारे दिशा दर्शक म्हणजे शिवाजी महाराज.-साहिल सिंह ,टेम्बीनाका शाळा (ठाणे )


छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी एक योद्धा आहेत आणि ते आज पण एक योद्धाच्या रुपात आपल्या हृदयात, मनात जगतात. ते मराठ्याचा अभिमान आहे. महाराज त्यांचा पालकांना देव मानत होते. देशावर खूप प्रेम करत होते की देशाची सेवा करत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. ते म्हणत होते की “समोर संकट दिसलं ना, त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभ राहायच आणि विजय मिळत नाही तो पर्यंत माघार घ्यायची नाही.असे ते आज पण मला प्रेरणा देतात! जय शिवाजी, जय भवानी! जय महाराष्ट्र!! जय शिवराय!!- किर्ती पटवा ,साधना विद्यालय


छत्रपती शिवाजी महाराजा सारखे राजे मी आज पर्यंत कधीच पाहिले नाही. शिवाजी महाराज खुप धाडसी होते. मला त्याच्या विषयी खूप आदर वाटतो. महाराजांचे स्त्रियांबद्दल असलेला आदर खरेच आपल्याला खूप काही शिकवणारे आहे. -शुभ्रा मोरे,साधना विद्यालया, सायन

Leave a Reply