शिक्षक आमदार पद हे शोभेचे किंवा मिरवण्याचे नसून ते जबाबदारीचे पद आहे – प्रा. डॉ.सुभाष जाधव

 

आज  शिक्षणव्यवस्थेत अनेक प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावत आहेत . नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातुन शिक्षक विद्यार्थी-पालक शिक्षकेतर कर्मचारी व गावोगावी समाजाच्या तळागाळात निष्ठेने व सेवावृतीने काम करणार्‍या संस्थासमोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. विशेषत: दलित आदिवासी, ओबीसी, बहुजन आणि  गरीब मुलामुलींच्या ,विशेषत: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अनेक जटिल अडथळे निर्माण होणार आहेत . केंद्र सरकार शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र खाजगीकरण, कंपनीकरण व बाजरीकरणाच्या दावणीला बांधत असल्याने शिक्षणाच्या संधी आक्रसत जाणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवा-शाश्वती; वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासन शिक्षण संस्थेचा आधार काढून घेत त्यांना अस्थिरतेच्या  गर्तेत ढकलत आहे. सरकारचा शिक्षणाबद्दलचा आणी शिक्षणावरील खर्चा संबंधी बदलेला दृष्टीकोण हे यामागील खरे कारण आहे .आजच्या या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचा प्रतिनिधी विचारपूर्वक निवडण्याची गरज असल्याने आपण मला विधानपरिषदेवर पाठवून आपले प्रश्न मांडण्याची व सोडवण्याची एक संधी द्यावी-प्रा. डॉ.सुभाष जाधव .

                                               

बार्शी /अब्दुल शेख- सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहचला आहे. सर्वच उमेदवार आपल्यापरीने मतदारांपर्यंत पोहचत आहेत.याचाच एक भाग म्हणून प्रा. डॉ.सुभाष जाधव हे सोलापूर दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील विविध महाविद्यालयांना भेट देवून शिक्षकांसोबत संवाद साधला.  त्यांनी शिक्षकांना मतदान करण्याचे आवाहान केले. यावेळी सर्व शिक्षकांनी आम्ही तुमच्यासोबतच आहोत असा निर्धार व्यक्त केला. बार्शी भेटी दरम्यान  प्रा.एस.एस.जाधव यांच्या निवासस्थानी प्रचारा संदर्भात बैठक पार पडली . यावेळी प्रा.संतोष जटीथोर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धाप्पा कलशेट्टी,डी.वाय. एफ.आय चे दत्ता चव्हाण तसेच शिक्षक उपस्थित होते . यावेळी बोलताना दत्ता चव्हाण म्हणाले की, प्रा. डॉ.सुभाष जाधव हे एम.ए अर्थशास्त्र , एम.फील, पी.एच.डी व सेट नेट उत्तीर्ण असेलेले उच्चशिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी एकूण ३२ वर्ष ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य व शैक्षणिक चळवळीचे कार्य करत असताना त्यांना अनेक वेळा अटक झालेली आहे . त्यांना येरवडा तुरुंगात ५ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे , तसेच त्यांचे कामगार चळवळतील कार्य उल्लेखनीय आहे अशा उमेदवारला आपण आपला प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर पाठवावा.

Leave a Reply