शासनाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या झाडाच्या जाळ्या चोरी करण्याचे प्रकार वाढले

पंढरपूर/नामदेव लकडे – सर्वत्र महाराष्ट्र शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात  केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या झाडाना संरक्षण करण्यासाठी असलेल्या जाळ्या रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे हि झाडे मोकाट जनावरे खात आहेत. तसेच हे जाळ्या चोरणारे आपल्याला कोणतीही कारवाई होत नाही म्हणून बिनधास्त झाडे मोडून या जाळ्या आपल्या घरासमोर लावलेल्या झाडांना लावत आहेत. हे चित्र सर्वत्र दिसून येत आहे परंतु यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. तसेच झाडे लावण्याचा  उद्देश सफल न होता हा नुकताच फार्स ठरत आहे.
यामुळे शासनाने या झाडे वाढविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. हे पैसे वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. तसेच हि वनसंपदा नष्ट होण्याची शक्यता आहे यावर काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे. हि झाडे घेरडी, वाणीचिंचाळे, कडलास,जवळा अशा विविध गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा लावली आहेत. परंतु अशा चोरांमुळे नक्की वनसंरक्षक करणार कि फक्त फोटो पुरतीच झाडांची लागवड दाखवणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
  
या चोरांना कडक कारवाई करून सदर झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिकांना मधून  व्यक्त होत आहे.

Leave a Reply