Breaking News

शहीद सुनील काळे यांना शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने श्रध्दांजली

प्रतिनिधी- बार्शी तालुक्यामधील पानगाव येथील सी.आर.पी.एफ.चे जवान वीर सुपुत्र सुनील काळे हे भारत मातेची सेवा करत आसताना जम्मू काश्मीर मधील पुलवाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झाले.या वीर सुपुत्रास श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगाव यांच्या वतीने ग्रामपंचायत मळेगाव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.पुलवामा येथे आपल्या जवानांवर वारंवार असे भ्याड हल्ले होत आहेत त्यामुळे आपले जवान शहीद होत आहेत,त्यामुळे हा प्रकार घडल्याबद्दल दहशतवाद्याना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान या देशाचा यावेळी निषेध करण्यात आला.पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.या दुःखातून काळे कुटूंबियांना सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी ही प्रार्थना करण्यात आली,यावेळी माजी सरपंच संतोष निंबाळकर,मंडळाचे संजय माळी,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,माजी सैनिक आजीनाथ गाडे,माजी अध्यक्ष रामहारी गाडे,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गाभने,भागीरथी वाचनालयाचे गणेश गाभने,मंडळाचे गिरीश माळी,यशवंत गाडे,ग्रामपंचायत चे क्लार्क सुरेश कांबळे,सुहास बुद्रुक, जयवंत गाडे,आदी मान्यवर व यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!