शहीद डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिंनांनीम्मित बार्शीत रक्तदान शिबीर


 बार्शी – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिंनांनीम्मित बार्शी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी,बार्शी  येथे आयोजित करण्यात आले होते.या .रक्तदान शिबिराचे उद्घाटन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्याचे अंनिसचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर यांनी केले. महा.अंनिस चे संस्थापक शहिद डॉ नरेन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2020 रोजी 07 वर्षे पूर्ण होत आहेत. मारेकरी व त्यांचे सूत्रधार यांचा तपास अजून चालूच आहे, आपण सर्व जण 20 ऑगस्ट हा स्मृतिदिन, शहीद दिन व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करतो. यावर्षी बार्शी अंनिस डॉक्टरांचा सातवा स्मृतिदिन रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला.अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आली.या रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यानी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा प्रधान सचिव प्रा डॉ अशोक कदम,हेमंत शिंदे,कायदा सल्लागार काकासाहेब गुंड,प्रवीण मस्तूद,विनायक माळी,सोमनाथ वेदपाठक,अजय मोकाशी,सुशांत कदम,सुजीत कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply