Headlines

शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी/अब्दुल शेख -:बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुलाणी यांची पक्षावर असलेली निष्ठा आणि काम करण्याची चिकाटी यामुळेच त्यांची निवड केली असल्याचे सांगितले.तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही मुलाणी यांनी भाजप पक्षाचे सर्वसमावेशक धोरण अल्पसंख्यांक समाजामध्ये राबवून पक्षाला बळकटी देण्याचे काम करावे असे सांगितले.शकिल मुलाणी यांनी समाजसेवेबरोबर आ.राजेंद्र राऊत यांचे निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली आहे.त्यांनी २०१२ साली मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष तर २०१५ साली मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे.त्याबरोबरच उडाण फाऊंडेशन या सामाजिक संघटनेतही ते कार्याध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.त्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात भाग घेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना १ महिन्यांचे मोफत पास दिल्याचेही मुलाणी यांनी यावेळी सांगितले.तसेच तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठीही अन्नदानाचे काम केल्याचे सांगितले.त्यामुळे मुलाणी यांना सामाजिक क्षेत्राबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते.त्यांच्या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत केले आहे.यावेळी नगरसेवक विजय राऊत,सभापती अनिल डिसले,शहराध्यक्ष महावीर कदम,तालुकाध्यक्ष मदन दराडे,वैरागचे संतोष निंबाळकर,बाबासाहेब काटे,प्रमोद वाघमोडे,उपसभापती अविनाश मांजरे,केशव घोगरे,ऍड.राजश्री डमरे-तलवाड,काका काटे,अजित बारंगुळे,किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *