Headlines

वीरपत्नी कविता म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण

                       

मंगळवेढा/अमीर आतार – ग्रामपंचायत हुलजंती येथे 74 वा स्वातंत्र्य दिन  उत्साहात साजरा  करण्यात आला.  यावेळी हुलजंती  गावचे शहीद जवान  नागप्‍पा सोमना म्हैत्रे यांना उपस्थित सर्वांच्या वतीने तिरंगा ध्वज व शाहिद म्हेत्रे यांना मानवंदना देऊन  श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर  वीरपत्नी कविता नागा प्पा म्हेत्रे यांचे व गावच्या सरपंच सौ.भाग्यश्री मासाळ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत हुलजंती यांचे वतीने कोरोना या विषाणू पासुन गाव अलिप्त ठेवण्यासाठी कोरोना नियमाचे पालन करणे याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने नम्र सुचना देण्यात आल्या . पी. एम. किसान योजने याबाबत कृषि सहाय्यक प्रशांत काटे यांनी माहिती दिली. तसेच गावामध्ये कोरोना शिरकाव झाल्याने गाव प्रतिबंध क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे तरी प्रशासनास सहकार्य करणे बाबत सुचना गावचे तलाठी विजय एकतपुरे यांनी केली. 
या कार्यक्रमासाठी  हुलजंती गावचे सरपंच सौ भाग्यश्री चंद्रकांत मासाळ ,  बिराप्पा कोटे , सौ निर्मला कनशेट्टी. महादेवी मासाळ, सुवर्णा माळी , जिल्हा ग्राहक मंच पदाधिकारी श्री श्रीकांत सोमुत्ते ( वडीयार ),  अमीर आतार. अविनाश कोरे , सर्कल  घुगे. भाऊसाहेब  , तलाठी  विजय एकतपुरे .भाऊसाहेब , अंगणवाडी कर्मचारी , आरोग्य कर्मचारी .,  माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाप्पा कोटे मनगेनी रायनाडे ,  युवा नेतेश्रीकांत मासाळ ,  बिराप्पा लोहार , नागराज कनशेट्टी सुरेश मासाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्वांचे आभार ग्रामपंचायत कर्मचारी श्री संतोष केशवराव जामदार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *