Breaking News

वीजबिल माफ करा- भाकप ची मागणी

बार्शी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 26 जून 2020 रोजी विजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मा. अधिक्षक अभियंता, सोलापूर यांना मा. कार्यकारी अभियंता बार्शी यांचे मार्फत हे निवेदन  देण्यात आले आहे.  निवेदणाची प्रत मा. मुख्यमंत्री यांना ही मेल करण्यात आली आहे.  हे निवेदन मा. तहसिलदार, बार्शी यांचे मार्फत काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हणले आहे, कोविंड मुळे सामान्य नागरिकांचे जगने मुश्कील झाले आहे.अशातच महावितरणकडून रिडिंग न घेता सरसकट आव्वाच्या सव्वा विजबिले पाठवली आहेत.कोरोना महामारीमुळे रोजगार नाही.याच काळत विजदरवाढ करून सर्व सामान्यांची लूट केली जात आहे त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटच्या या काळात सर्वांची विजबिले माफ करावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदण काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड पवन आहिरे कॉ. बालाजी शितोळे यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!