Headlines

विद्यार्थी सहाय्यक समितीचा अनोखा उपक्रम

जालना  :-विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे,यांच्या वतीने राज्यातील होतकरु व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे पाच वस्तीगृह चालविले जाते यामध्ये राज्यातील मुल मुली शिकत आहे.या समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात.यावर्षी कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी आपल्या गावीच आहे.समितीने त्यांना आशीर्वाद वृक्षारोपण हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी माहिती दिली.यामध्ये अनेक दानशुर व्यक्तीने आपल्या आई ,वडील व आदर्श व्यक्तीच्या स्मृतीत झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला व योगदान दिले.   या उपक्रमात मोठ्या प्रमाणात देशी वृक्षाची लागवड करुन पुढील काळात जतन करण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांनी घेतली .यामध्ये  गावा गावातील समितीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला .
जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरी येथील समितीची विद्यार्थीनी कु.नेहा सय्यद हिने या उपक्रमात सहभाग घेऊन कुंटूबाच्या सहकार्याने गावातील गैबनशाह वली यांच्या दर्गा मध्ये वृक्षारोपण केले .यावेळी 26/11 च्या घटनेत शहीद तुकाराम ओंबळे.व अमृते अरुणा दत्ताञय यांच्या स्मृतीत वृक्षारोपण केले यासाठी सुनिल चोरे व गणेश काळे यांनी मार्गदर्शन केले.आशीर्वाद वृक्षारोपण यासाठी अविनाश आमटे आणि संजय अमृते यांनी योगदान दिले.पुढील काळात सदर वृक्षाचे  संगोपन व जतन करण्यासाठी पालक बिसमिल्ला सय्यद यांनी जबाबदारी घेऊन समितीने या  माध्यमातून पर्यावरण, निसर्गाशी नाते जोडणा-या उपक्रमात सहभागी केल्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *