विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेतर कर्मचारी यांचे लेखणी काम-आवजार बंद आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती च्या वतिने दिनांक 24 सप्टेंबर 2020 पासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन षिक्षकेतर कर्मचारी  आश्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा व इतर मागण्या घेवून लेखनी बंद आवजार बंद अंदोलन करणार आहेत.  यामध्ये आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि ’चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कॉलेज कर्मचारी युनियन, महाविद्यालयीन महासंघ या संघटना एकत्र येवून हे अंदोलन करणार आहेत.  यासाठी मा. कुलगुरू पु.आ.हो. सोलापूर विद्यापीठ, मा़. उच्च शिक्षण सहसंचाल व ठिकठिकाणचे मा. प्राचार्य यांना निवेदणे सादर करण्यात आली आहेत.  यावेळी बार्शीमध्ये सर्व माहाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदणे सादर करण्यात आली.  मा. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी या मागण्या मान्य न केल्यास पूढे 1 आॅक्टोबर 2020 पासून विद्यापीठे व महाविद्यालये बंद अंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदणात म्हणले आहे, आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले जीआर पुर्नजिवीत करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, विद्यापीठ कर्मचारी, अधिकारी यांना 7वा वेतन आयोग द्या, 5 दिवसांचा आठवडा लागू करा, महाविद्यालयने व विद्यापीठातील रिक्त पदे भरात, मा. सरर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रामाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा, षासनाचे व वित्त विभागचे षासकीय कर्मचार्यांचे जीआर निघालेल्या दिवसापासूनच लागू करात, शिक्षकेतरांच्या प्रष्नांसाठी डाॅ. सोमजी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुर्नगठन कराव ती समिती कार्यान्वीत करा या मागया करण्यात आल्या आहेत.
हे अंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती चे सर्व पदाधिकारी तसेच काॅम्रेड तानाजी ठोंबरे, गजानन काशिद, काॅम्रेड  राजेंद्र गोटे, काॅम्रेड प्रविण मस्तुद, उमेश मदने, भिमा मस्के, ए. बी. कुलकर्णी, प्रषांत चोरमूले, आरती रावळे, अजितकुमार संगवे, राजेंद्र गिड्डे, वसंत सतकाळे, विलास कोठावळे, दत्ता भोसले, मल्लीकार्जून हायनाळ, हणुमंत कारमकर, दत्ता्त्रय पवार, गणेश कारंजकर, दत्ता वाघे, अमर कांबळे, अशोक पवार, परमेश्वर पवार, सुरेष खराडे, पांडूरंग भोंग, विद्या सोनवणे, श्रीकांत वाघमारे, भागवत सरक, कैलास कांबळे हे संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply