Headlines

विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सोलापूर -सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना  बधितांच्या संख्या आणि मृत्यूचे दर हे झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे.


यामुळे जनजीवन आणि प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झालेली आहे.एकंदरीत याचा ताण अनेक घटकांवर पडलेला असून विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि भवितव्यावर परिणामकारक ठरत आहे. सोलापूर विद्यापीठाशी निगडित असलेल्या महाविद्यालयातील विध्यार्थी हे बहुसंख्य अत्यल्प उत्पन्न घठातील असून विध्यापीठाचे शुल्क अधा करण्याचे आर्थिक क्षमता आजच्या घडीस नाही तरी विद्यापीठाच्या प्रशासनाने याची नोंद घेऊन सरसकट सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याची आग्रही मागणी SFI चे सोलापूर जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी सोलापूर विध्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे मागणी केली. विध्यापीठाकडून शुल्क माफ न केल्यास सदनशील मार्गाने विध्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील असा इशारा दिली.

   

सोमवार  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) जिल्हा समितीच्या वतीने सोलापूर विद्यापीठ निगडित असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करावे ही प्रमुख मागणी घेऊन सोलापूर विध्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली.तदनंतर मल्लेशम कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली विध्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मा. सोलापूर विध्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले.

                      

या शिष्टमंडळात सहसचिव शामसुंदर आडम, राहुल भैसे, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, पूनम गायकवाड, विजय साबळे, दत्ता हजारे, लक्ष्मीकांत कोंडला इ. होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *