Breaking News

वाढदिवस साजरा करणार नाही – समाजसेवक अशोक माळी

प्रतिनिधी/आसिफ मुलाणी- महाराष्ट्र राज्यावरती व भारत देशावर कोरोना या विषाणूजन्य रोगाचे संकट उभे आहे,आपल्या देशात व राज्यात दररोज कोरोनाचे हजारो पेशंट सापडत आहेत,आशा या संकटामध्ये वाढदिवस,किंव्हा उत्सव साजरे करणे हो बरोबर नाही,20 जुलै रोजी होणारा वाढदिवस साजरा करणार नाही म्हणून प्रत्येक नागरिकाने आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी हेच मला मी वाढदिवसाचे गिप्ट समजेल,व या रोगाला सर्वांनी एकत्रित येऊन लढा देऊया व राज्यातील डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, कोविड योद्धे,या प्रशासनाला,साथ देऊया व पुन्हा एकदा नव भारत घडवण्याचा संकल्प करूया व कोरोनाला आपल्या देशातुन हद्दपार करूया असे सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांनी सांगितले.
अशोक माळी हे मळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत.पंचक्रोशीतील सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.माळी समाजाचे भूषण आणि युवकांसाठी मार्गदर्शन असणारे अशोक माळी यांच्या या निर्णयाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!