Headlines

वाटेगाव ते रशिया – अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांचा प्रवास


मार्क्सवादावर अढळ निष्ठा ठेवत कष्टकरी चळवळ, साहित्य तसेच श्रमिकांच्या सांस्कृतिक जगाला उंच शिखराव नेहणारे अण्णा भाऊ यांचे स्थान मराठी साहित्य वाड्मय क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे एकूण आयुष्य 49 वर्षाचे राहिले परंतू साहित्याच्या विविध अगांनी त्यांनी केलेले लिखान आजच्या घडीला देखील तितकेच प्रेरक, मार्क्सवादी वर्गीय दृषि्टकोनातून वर्गकलह मांडत असणारे दिसते.

कथाकार, कांदंबरीकार, नाटक लेखक, शाहिर, लोकनाट्याचे जनक, प्रवासवर्णणकार अशा विविध अगांनी काम करणारे अण्णाभाऊ हे केवळ बुध्दीवंतच नव्हते तर ते कामगारांमध्ये काम करणारे एक तळमळीचे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही होते. 
 देशस्वातंत्र्यांच्या चळवळीत, संयुक्त महाराष्ट्रच्या रणसंग्रामात स्वतःला झोकूण देवून काम करणारे अण्णाभाऊ एक हाडाचा कार्यकर्ता, क्रांतिकारी नेता म्हणून आपणाला दिसतात.  तसेच ते दुष्ट, अनिष्ट प्रथापरंपरा, रितीरिवाज यांना नकारणारे व जून्या व्यवस्थेला लाथाडून नव्या मूल्यांना, नव्या समाज व्यवस्थेला स्विकारणारे लेखक होते.
 अण्णाभाऊंनी दारिद्र्य, समाजाच्या उपेक्षेचे चटके, वेठबिगारी, पिळवणूक, कष्टप्रद दुःखी जिवण अनुभवले होते, त्यामुळे शोषणविरहि समाजरनेच्या ते प्रेमात पडले होते.  त्याहेतूनेच नव्या जागाची आस घेवून अण्णाभाऊ सतत त्यांच्या लिखाणातून असेल, कृतीतून असेल संघर्षरत असलेले दिसतातत.  त्यांनी स्विकारलेला कम्युनिस्ट विचार हा त्यांच्या कृतीला दिशा देनारा ठरला.  अण्णाभाऊंनी संपूर्ण हयात मार्क्सवादी विचारधारा स्विकारूण काम केल्याने मार्क्सवादी विचाराच्या संघर्षातून निर्माण झालेले जग नेमके कसे असते याचा विचार ते करीत रहिले.  मार्क्सवादी विचारांच्या संघरर्षातून निर्माण झालेल्या समाजवादी रशियाबद्दल यामूळे काॅम्रेड अण्णाभाऊंना तिव्र ओढ निर्माण झाली. आणि त्यांनी त्यांचे समाजवादी जग पाहण्याचे स्वप्न समाजवादी रशियात जावून  ´समाजवादाचं यश´ पाहूण पूर्ण केले.  अण्णा भाऊ मार्क्सवादी जागाच्या किती प्रेमात पडले होते हे त्यांच्यांच शब्दांतून बघू, ते म्हणतात, “आपण वाटेल ते करून एकवेळ सोविएत संघराज्य पाहावे, असं मला फार वाटत होतं.  ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबल होत होती.  रशियातील ते कामागार राज्य कसे असेल, तिथं काॅम्रेड लेनिननं केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल, ती नवी दुनिया, नी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल, या विचारांनं माझं मन भरावलं होतं.  मी वेडाचा झालो होतो”
 अण्णा भाऊंचा जन्म 1 आॅगस्ट 1920 रोजी वाटेगांव या छोट्याशा गावात झाला.  आज 1 आॅगस्ट 2020 रोजी काॅम्रेड अण्णाभाऊंच्या जन्माला 100 वर्षे पुर्ण होत आहेत.  समाजवादी भारत निर्माण व्हावा यासाठी विचार लिखान व संघर्षाची धार तिव्र करणार्या अण्णा भाऊंनी पाहिलेला समाजवादी रशिया कसा याचा ढांडोळा त्यांच्या ´माझा रशियाचा प्रवास´ या प्रवासवर्णावरून घेण्याचा या लेखातून छोटा प्रयत्न केला आहे.  
 अण्णा भाऊं म्हणतात, “मी सन 1934 च्या दम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती.  ´रशियन क्रांतीचा इतिहास´ कॉम्रेड लेनिनचे चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खुप परिणाम केला होता.  आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो.  कसंही करून एकदा रशियाकडे सरकावं असा माझा विचार झाला होता.” त्यासाठी त्यांनी दोनदा पासपोर्ट मिळावा यासाठी अर्ज केला होता.  सिनेनट बलराज सहानी यांनी पॅरिसपर्यंतची तिकिटेही काढली होती.  परंतू कम्युनिस्ट विरोधी राजकारण आडवले आल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. 1948 सालचे जागतिक शांतता परिषदेचे हे निमंत्रण होते.
 पुढे 1961 मध्ये ´फकिरा´ कादंबरीस राज्य सरकारचा पुरस्कार मिळाल्यानंतर इंण्डो सोविएत कल्चरल सोसायटीनं रशियाला जावं असं ठरवले व त्या संस्थेने अण्णा भाऊंना पत्र देवून रशिया भेटीची निमंत्रण दिले.  यावेळी मात्र त्यांच्या जवळ एक पैसाही नसताना सर्व महाराष्ट्राने त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडला आणि पासपोर्टही मिळालं.
याच प्रवासवर्णनात अण्णा भाऊंनी रशियन प्रवासाला लागण्या आगोदर, कॉम्रेड एस. ए. डांगे,  कॉम्रेड उषाताई डांगे यांची भेट यावेळी उषाताईंनी “माझा अण्णा मॉस्कोला निघाला” असं म्हणत पाठीवरूनहात फिरवत आईची आठवण करून दिली.  आणि त्यांच्याकडून ताश्कदपर्यंतचं जाण्या येण्याचं तिकीट आणि व्हिसा दिला गेला.  त्या भेटीच्या दुसर्याची दिवशी अण्णा भाऊ ताश्कदसाठी तयार झाल्यानंतर डांगे अण्णा भाऊंच्या जवळ जात त्यांचा साहेबी पोषाखवरचा हसत त्यांचा टाय सरळ बांधला व पुढे आणि पाठीवर हात मारला.  कॉम्रेड डांगे बद्दल नितांत आदर असल्याने अण्णा भाऊं म्हणतात, “ज्या हातांनी कामगारांच्या अनेक पिढ्या घडवल्या ते हात माझ्या पाठीवरून फिरताच माझं काळीज डोंगराऐवढं झालं!  मुंबईत आचार्य अत्रे आणि दिल्लीतून कॉम्रेड डांगे यांचे आशीर्वाद घेऊन ´चितोड की रानी´ या भारतीय विमानातून मी आकाशात झेप घेतली”

 अण्णा भाऊ कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते ते शोषणविरूध्दच्या लढ्यात आग्रभागी असायचे, त्यामुळे कम्युनिस्ट देशात शोषण आहे काय हे पाहण्याची सुचना ते सोवित रशियाच्या प्रवासाला निघताना कित्येक सहकार्यांनी केल्या होत्या, त्यात रशियात किती झोपड्या आहेत ते पाहण्याची सूचना, “पुलाखाली किती लोक राहतात, याची काळजीपूर्वक तपासणी करा,… देव निर्वासित झाले आहेत, ते कुठं राहतात त्यांची परिस्थिती काय आहे, हे न चुकता पाहून याआणखीही कित्येक सुचना आल्या.  वर्णभेदव्यक्तिस्वातंत्र्यबेकारी…. म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून मी यावेअसे त्यांचे मत होते.”
 या प्रवासामध्ये अण्णा भाऊंच्या सोबत असणारे सिलोनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राचे संपादक आणि सिलोनी लोकसभेचे सभासद होतेबंगालचे चतर्जी, मद्रासचे जॉन या सर्वांच्या वागण्या, बोलण्याची त्याचप्रमाणे मॉस्कोपर्यंत पोहण्याची इत्यंभूत माहिती, मनात होणारा वेगवेगळ्या भावणांचा कल्लोळ, हवाई जाहजातून दिसणारा नजराणा येथपासून ते हवाई सुंदरींनी केलेली मदत, काळजीतीचे बोलणे इतक्या बरीक सारीक बाबींची मांडणी या प्रवासवर्णनामध्ये करतात.   म्हणजेच अण्णा भाऊ जो प्रवास करीत होते त्यात ते किती उत्साही आणि जागृत होते हे लक्षात येते.  आपले आवडते जग पहायला जाताना ते एकही प्रसंग आपल्या नजरेतून निसटू देत नव्हते हे विषेश.
अण्णा भाऊ ज्या वेळी मॉस्कोतील ´सोवितएत स्काय´ या हाॅटेलमध्ये पोहचल्यावर तेथे स्वागतासाठी आलेल्या कॉम्रेड बारनिकोवचे यांची भेट होते.  या भेटीत बारनिकोव अण्णा भाऊंना ´उद्या काय काय पाहणार आहात´ असे विचारतात त्यावर अण्णा भाऊंचे उत्तर अत्यंत सुंदर आहे ते म्हणतात, “प्रथम रशियातली माणसं!” सतत माणसांच्या गराड्यात असणार्या लोकसाहित्यीकाचं हे उत्तर साजेस होतं. 
भारतातून अण्णा भाऊंच्या सोबत रशिया पाहण्यासाठी आलेले वेगवगेळ्या विभागातील मंडळी कोणी रशियन वैद्यकीय व्यवस्था, कोणी रशियन लोकशाही, कोणी रशियन कायदे मंडळाचा अभ्यास करू इच्छित होते तर कोणाला पियोनो ऐकयाचा होता, परंतू कलंदर अण्णा भाऊंना मात्र या देशातील फुटपाथनं भटकायचं होतं. 

अण्णा भाऊ, समाजवादी माणसं न्याहळण्यासाठीच रशियात गेले होते.  त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रका व्यतरीक्त इतर जे जे त्यांनी पाहिलं ते अत्यंत खुबीनं आपल्या प्रवासवर्णनात ते लिहलं आहे.  ते म्हणतात,  मी दारातच फुटपाथवर थांबलो,  माझ्यापुढं रस्तादुरूस्तीचं काम चाललं होतं.  अवघी पाच माणसं ते काम करीत होती.  पाच माणसं नि एक मोटार एवढंच, दुसरं काहीच नव्हतं, उकरण्याचं, माती भरण्याचं नि पूर्वीच डांबर वितळवून काढण्याचं काम ती मोटार करीत होती.  बकीचे कामगार सूटबूट घालुन देखरेख करीत होते.  आमच्याकडील बड्या ऑफीसरासारखा त्यांचा थाट होता.  तिथं सक्ती नव्हती.   गुलाम नव्हते. मात्र ते यंत्रच त्या माणसांचा गुलाम होऊन गुमान काम करीत होतं”  अण्णा भाऊंच्या मानात असणारी गुलामगरी विरोधी, केल्या जाणर्या सक्ती विरोधातील त्यांना जाणवणारं तेथील व्यवस्थापन भावणारं होतं.  भांडवली व्यवस्थेत यंत्राकडून केलं जाणारी माणवी कष्टाचं शोषण अण्णां भाऊ पाहत असल्यानेच समाजवादी जगात माणसाला माणूस बननं अनं यंत्राला यंत्र बनलेलं पाहून ते या बाबत वरील मांडणी करताना दिसतात.


अण्णा भाऊ रशियातील प्रवासात अगदी थोडाच प्रवास रेल्वेने केला. त्यात अण्णा भाऊ लेनिग्राडला, अझरबैझानची राजधानी बाकूहून ब्लीसीपर्यंतचा प्रवास त्यांनी रेल्वेने केला.  अगदी थोड्या प्रवासात त्यांनी जे अनुभवले ते त्यांच्या रोजच्या अनुभवाहून वेगळे होते.  समजावादाचं वैभवाचं वर्णन करावं असं ते वर्णन आहे ते म्हणतात,  लेनिनग्राडला जातेवेळी आमची व्यवस्था उत्तम केली होती.  एका कंपार्टमेंटमध्ये दोन पलंग, स्वच्छ गाद्या, तशाच उशा चादरी, नळ,  कंगवा,  साबर,  पावडर,  रेडिेओ, म्हणजे सारंच!  शिवाय प्रवाशांची देखभाल करायला एक बाई होती.  ती बाई आपली मुलं झोपली का याची आईनं चौकशी करावी तशी खपत होती.
 मला तो रेल्वे प्रवास कसासास वाटला.  मला पटकन बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली.  ती गर्दीतो कोलाही, ती धावपळ, त्या मारामार्या डब्यात ठासून भरलेली माणसं, त्यांचा गलाकाबिथराबिरी नि ´बोल बंबादेवी, जय´ हा सर्व प्रकार माझ्या हाडामासी भिनलेला! मी त्याला कसा विसरूघ् तषापैकी त्या स्टेशनात काहीच नव्हतं.  सर्व काही शांत वाटत होतं.  फलटावर जळकी काडी नव्हती.  पेटती सिगारेट नव्हती.  मग बिचारी बिडी कोठून येणार!  त्या स्टेशनमध्ये एक तर पोस्टरांची जत्रा भरली नव्हती आणि जी होती ती स्वच्छ होती.  त्यावर मी कल्पना केली की, येथे थुंकू नये, असं पोस्टर लावताच त्यावन पान खाऊन थुंकणारा प्राणी या रशियात नसावा.  नाही तर हे इतकं सुंदर पोस्टर घाटकोपरला ऐवढ्या आरामात काय राहातं!  कधीच याच्या बत्तर बाळ्या झाल्या असतयाण्  पोस्टरवर मीनाकुमारीला मिश्या लावणार्या आणि पृथ्वीराजच्या मिशा  भादरवणर्या कलावंतांनी कधीच आपली कला दाखवली असती…………. गाडी शांत होती.  काही लोक निवांत झोपले होते काही वाचीत बसेले होते.  मध्येच काहीतरी विनोद होऊन हास्याचा स्फोट होत होता.  परंतु उठबसणीचा खेळ कुठं दिसला नाही.   बाकाखाली आराम नाही की संडासात दडी मारलेला महाभाग नाही!  सारंच निराळं!  ज्र या गाडीत गर्दीच नाहीत तर इथं खिशाला कात्री लावणारा कारागीर कसा असणार!  याचा विचार करीत मी एका डब्यात शिरलो.  तिथंही सारं शांत.  मला टी.सी. हा प्राणीच दिसला नाही. ´जय सौजन्य सप्ताह´ म्हणून प्रवाशांच्या टाळक्यात जोडा मारणारा सज्जन टी.सी. मला कुठंच भेटला नाही.!
 मात्र एका प्रसंगानं मला स्तंभित केलं.  एका खिडकीजवळ एक सुंदर तरूणी बसली होती.  तिची मान कलती होऊन  ती काचेवर टेकली होती.  तिने डोळे झाकले होते.  ते डोळे न उमलेल्या कळीप्रमाणे बंद होते.  तिच्यापुढे एक लहानसा पाळणा  लोंबत होता नि त्या शुभ्र पाळण्यात एक लहानसा रशियाचा नागरिक विसावा घेत होता.  आईच्या कुशीत मनसोक्त निद्रा घ्यावी तसा तो निद्राधीन झाला होता.  त्याला त्याच्या लेनिनने सर्व काही दिले होते.  तो एक महिन्याचा असावा परंतु आतापासूनच रशियन संघराज्य त्याची काळजी घेत होतं.  त्याला प्रवासात एक सुंदर पाळणा दिला होता.  कारण हाच बालनागरिक मोठेपणी आपलया मातृभूमीसाठी शंभरदा मरणार याबद्दल सोविएत संघराज्याला खात्री होती.” अण्णा भाऊ त्यांच्या लिखानातून अत्यंत सुंदर वर्णन करून समाजवादी जग आणि भांडवली शोषणकारी जग यांची तूलना करताना दिसतात.  मुंबई रेल्वेत दिसणारं कष्टकर्यांचं हाल आपेष्टा, दैन्य, लाचारी, पोटसाठी असणारी धडपड, त्यासाठी चोरी, पळापळ तर त्या उलट आणि समाजवादी जगानं उद्याच्या कष्टकरी नागरिकासाठी केलेली सोय व त्याच्यावर दाखवलेला विश्वास यांची अचूक मांडणी करून, ज्या कॉम्रेड लेनिन यांनी ही कष्टकरी समजवादी क्रांती घडवून आनली त्यांच्या विचारात गुंतत जातात.
अण्णा भाऊंच्या जाण्या आगोदरच त्यांच्या कादंबर्या, पोवाडे रशियात मध्ये जावून पोहचले होते.  ´लेनिग्राडचा पोवाडा´ तर तेथे लोकप्रिय झाला होता, अण्णा भाऊ जेव्हा लेनिनग्राड ला पोहचले तेव्हा तेथे ज्यांनी चित्रा कादंबरी रशियन भाशेत अनुवादीत केली होती त्या ततिया त्यांना भेटल्या, त्या अस्खल मराठी बोलत होत्या. 
त्यामुळेच अण्णा भाऊ लाल झेंड्याचं कौतूक करताना म्हणतात,

मार्क्सवादाचा प्रखर निखारा
रथ क्रांतीचा न थांबणार
दलित जनांचा अजिंक्यतारा
झारशाहीच्या ठिकऱ्या केल्या
रोवून झेंडा लाल

कॉम्रेड लेनिन यांच्यावर वरील शब्दांची उधळण करणार्या अण्णा भाऊंनी लेनिनग्राड मध्ये केरेन्स्की सरकारला अटक झालेली खोली व प्रथम सोवियत स्थापन झालेले स्थळ पाहिले.  कॉम्रेड लेनिन यांच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर अण्णा भाऊंना ऑक्टोबर क्रांतीचा पिता तेथे नसल्याचं दुःख झालं, त्यांचे डोळे भरूण आले परंतू कॉम्रेड लेनिन यांची खोली पाहिली यातच ते समाधानी होतात.  1942 ला हिटलरच्या नाझी आक्रमकांनी लेनिग्राडला वेढा दिला यावेळीच्या दैदिप्यमान लढ्याचं स्मारकं अण्णा भाऊ पाहतात व त्यांच्या शब्दात हे स्मारक वाचकांच्या डोळ्यापुढे आहे असं उभ करतात.  त्यात ते म्हणतात, “कडेवर मूल घेऊल एक स्त्री असून, समोर कॉम्रेड लेनिन उभे आहेत.  मागे दगडावर लेनिनग्राडसाठी मराणर्या वीरांची नावे कोरली आहेत.   फुलझाडाच्या ताटव्यात चार फूट उंचीचे चबुतरे उभे असून, त्यावर फक्त ´एकोणिसशे बेचाळीस´ अशी अक्षरे दिसत आहेत आणि पहिल्याच प्रवेशव्दाराजवळ एक अग्निकुंड धगधगत आहे.  ती आग आज कित्येक दिवस जळत असून, जगाच्या अंतापर्यंत जळणार आहे.  ती आग म्हणजे महान लेनिनग्राडसाठी, रशियन भूमिसाठी, समाजवादासाठी ज्यांनी प्राण अर्पण केला त्यांची स्मृती आहे.”
 या प्रवासात अण्णा भाऊंच्या मनाव कोरला गेला असाच एक नाट्यमय प्रसंग आहे, यामध्ये अण्णा भाऊंनी खरेदी केलेली खेळणी व कॅमेरा हरवला त्यावर ते त्यांच्या दुभाषी बारनिकोव यांना त्याची माहिती देतात, त्यानंतर काही वेळातच अण्णा भाऊ ज्या सोविएत स्काय हॉटेल मध्ये थांबलेले असतात तेथे पोचवला जातो यावर अण्णा भाऊंची लिहलेली प्रतिक्रिया अत्यंत उद्बोधक आहे, समाजवादी जगातील माणसांची ती तारीफचं आहे, ते म्हणतात, “रशियन माणूस यंत्राचा गुलाम नसून यंत्रच त्यांच्या आधीन आहे.” अण्णा भाऊ प्रवासात कॅमेरा, पेन, रामायाण नि गिटार या वस्तू हारवल्या आणि परत सापडल्या.  त्यामुळे समाजवादी देशातील माणसं किती व्यवहारदक्ष आहेत याची प्रचिती अण्णा भाऊंना येते.
 ´समाजवदाचं यश´ नि ´मॉस्कोची माणसं कशी आहेत´ या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी  अण्णा भाऊ मॉस्कोतील रस्त्यावरून फेरफटका मारण्यासाठी निघतात तेव्हा मॉस्को शहरातली स्वच्छता, तेथील माणसांचं त्यांच्या देशावर असणारं प्रेम याबद्दल लिहता, ज्या गॉर्कींचा आदर्श डोळ्या समोर ठेवत, लिखानाच्या टेबलावर गार्कींचा पुतळा समोर ठेवत अण्णा भाऊंनी जे साहित्य विश्व निर्माण केलं त्या गॉर्कींच्या नावाने असलेल्या रस्तयावरून जाताना त्या देशानं कलावंताना दिलेला मान त्यांच्या नजरेतून सूटत नाही, त्यावर अण्णा भाऊ म्हणतात, “ज्यानं दलितांचे साहित्य नि साहित्यिक निर्माण केले आणि जो सोविएत साहित्याचा पितामह मानला गेला त्या महान गॉर्कीचं नाव धारण करणरा तो गॉर्की पथ गॉर्कीइतकाच भव्य आणि निर्मळ दिसत आहे.  आजही तो आपल्या मॉस्को नगरीची शोभा व्दिगुणित करीत आहे. ……..कित्येक मार्गांना, चैकांना, कलावंतनांची नवं दिली आहेत नि त्यांचे भव्य पुतळे उभे केले आहेत.  त्यांचचं साहित्य आणि इतिहास या दोन गोश्टी अगदी हातात हात घालून जागोजाग उभ्या आहेत.  टॉलस्टॉय, पुश्कीन, गॉर्की, मायाकोवस्की, ही नावं सजीव झाली आहेत.”

 मॉस्कोत अण्णा भाऊंना जे मित्र मिळाले ते फोटोग्राफर, मोटार ड्रायव्हर, बागेत काम करणारे, हॉटेलमधील मुली, लिफ्ट चालवणर्या वृध्द बाया होत्या त्यांच्या कडूनच अण्णा भाऊंनी रशिया समजून घेतला.  सतत माणसात वावरणारे कष्टकरी आण्णा भाऊ रशियात जावून साधी कष्ट करणारी माणसं जवळ करून त्याचं जगणं समजून घेत होते.  मॉस्कोमध्यील माणसांची पळापळ पाहूण अण्णा भाऊ अचंबीत झाले.  हि माणसे पाळतायत काय हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला व या प्रश्नाचा निकाला लावयाचा असे त्यांनी ठरवले काहिंना धरून ते पळत असल्याचे कारण विचारले त्यावर अण्णा भाऊंना मिळालेले उत्तर चकीत करणारे होते, ´आम्हाला आमची सप्तवार्षिक योजना लवकरच पूर्ण करायची आहे´ असे तो होते.  त्यावर अण्णा भाऊ लिहतात, “हे कारण ऐकून मी चकित झालो.  ती सुंदर, नम्र, सभ्य माणसं विचारीही आहेत, हे मला कळुन चुकलं. 

समाजवादाचे यश त्या जनतेच्या विचारात अगदी खोल आहे.  तिथं प्रत्येक माव आपलं पाऊल देशहितार्थ टाकीत आहे.  त्याला भविष्याची आस लागली आहे.  तो सुखासाठी, शांततेसाठी, एकही क्षण वाया दवडीत नाही.  म्हणून नम्रता, सभ्यता, तिथे फुलाप्रामणं फुलत आहे.  सुखाचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.  या जनतेनं गेल्या चाळीस वर्षात अपार त्याग केला आहे.  रक्त, अश्रु नि घाम गाळून समाजवादाची प्रतिष्ठा वाढवली आहे नि ती राखली आहे ती जनता रणत रणपंडित आहे.  आक्रमकांच्या गुहेत शिरून त्यंचा तिने चुराडा केला आहे.  पण तो रणात.  एरव्ही ती जनता षांतताप्रेमी आहे.” रशियन जनतेचे असे वर्णण करून अण्णा भाऊ त्यांच्या त्यागाची, कश्टाची, शौर्यांची व समाजवादासाठी असणार्या विचारी मेंदुची आणि तरीही त्यांची नम्रता, सभ्यता यांना आधोरेखीत करतात.  अशी जनता आपल्या भारतभूवर तयार व्हावी यासाठी ते या जनतेकडे विलक्षण नजरेने पाहत रहतात.
 रत्यावरून भटकताना अण्णा भाऊंच्या सिगारेटला एका रशियनानं काडी लावूण दिली व यावेही अण्णा भाऊ अचंबित झाले, त्यांना हे अनपेक्षीत होतं, त्या माणसानं भाऊ भारतीय आहेत हे ऐकूण गळाभेट दिली अनं अगदी पंप्रधान नेहरूंचींच चैकषी केली. रशियन माणसं भारतीयांवर किती प्रेम करीत होती हे यांचचं उदाहरण होतं.
 समाजवादी रशियातील लाल चैकाच्या वरच्या बाजूला एका जून्या चर्चला भाविक जात असल्याचे त्यांनी पाहिले छातीवर क्रुसाच्या खुणा करताना अण्णा भाऊ पाहतात होते त्यावर ते म्हणातात, “तिथं भाविकांच्या भावना मुक्त आहेत.” कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारलेल्या देशात भावना मुक्त असल्याचे सांगून अण्णा भाऊंना रशियन प्रवासाला लागताना एकानं ´देव निर्वासित झाले आहेत, ते कुठं राहतात त्यांची परिस्थिती काय आहे, हे न चुकता पाहून या….!´ या विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध लावून टाकतात. 

 ज्याचे वडील दुसर्या महायुध्दात विरगतीला प्राप्त झाले त्या 21वर्षीय विरपुत्र लिओनिदला अण्णा भाऊ काही प्रष्न करतात, त्यात ´त्याचे लग्न झाले आहे काय..! त्याची भावी पत्नी कशी आहे..!´ त्यावर तो युवक ´लवकरच लग्न करत असल्याचे अण्णा भाऊंना सांगतो व त्याच्या पत्नी बद्दल ती फार सुंदर, गुणी व त्याचे भाग्य थोर, असल्यानेच त्याला ती मिळाली´ असल्याचे सांगतो.  अण्णा भाऊ त्याला ´त्याच्या भावी पत्नीवर प्रेम आहे..!´ का असा सवाल करतात त्यावर ´तो गप्पकन आपल्या ह्दयावर हात ठेवून होय म्हणतो.´ हा सर्व खटाटोप अण्णा भाऊ “रशियन तरूणांत वैफल्य आलं असून, त्यांच्यात लैंगिक विकृती बोकाळली आहे, असा काही महाभाग अरोप करतात.  त्याला लिओनिद लाल चैकात जणू उत्तरच देत होता.” यासाठीचं करीत होते. 

समाजवादी जागत स्वैराचार, लैंगिकता बोकळण्याच्या अरोपाला मिळालेलं ते उत्तर होतं अण्णा भाऊंनी तो सर्व प्रसंग खुबीनं मांडत त्याचं खंडण केल्याचं दिसतं.  याच तरूणाकडून तो फोटोग्राफी करूण जगत असल्याचे कळल्यानंतर अण्णा भाऊ ´त्या व्यवसायावर त्याचा संसार कसा चालणार..!´ असा प्रश्न करतात त्यावर दिलेलं उत्तर हि बोलकं आहे तो तरूण म्हणतो, “इथं समाजसत्तावाद आहे नि त्यानं आम्हांला जगण्याची शाश्वती दिलेली आहे, हे तुम्ही विसरता सातेजी”  (सातेजी हा शब्दोउल्लेख अण्णा भाऊ साठी आहे) समाजवादी जागत कोणतंही काम केलं तरी तेथे जगण्यासाठी दिली गेलेली शाश्वती माणसाला स्वछंदी बनवते असचं वरील प्रसंगावरूण नजरेस येतं.
 माॅस्को मध्ये अण्णा भाऊंनी पहिलं भाषणं केलं.  त्यांचे भाषण श्रोत्यांना समजावं यासाठी दोन दुभाषे तेथे उपस्थीत होते.  मराठीतून इंग्रजीत व इंग्रतीतून मराठी असा तो अनुवाद होता.  या भाषणानंतर त्यांच्यावर कॅमेर्यांची मुरकंड पडली.  इतके ते प्रभावी भाषण ठरले.  भाषणाच्या पहिल्या भागात ते म्हणात, “कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हांवर ही पहिलीच वेळ आली असावी.  परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे.  त्या राज्यात सोडतीन कोटी लोक मराठी बोलतात नि ती माणसं तुमच्यासरखीच नेक, झुंजार आहेत.  तुमचा अफानासी भारतात गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरतीवर, महाराष्ट्रराज्यात, शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलतोय…….” मराठी भाषेवर नितांत प्रेम कराणारे अण्णा भाऊ मराठी माणसाची नेकी अनं झुंजारू वृत्ती रशिपर्यंत घेत जावून तो महाराष्ट्र कष्टकर्यांचा जनतेचा राजा, छत्रपती शिवाजी राजांचा असल्याचे सांगतात. 
 रशियातील नवी सृष्टी, नवा समाज, समजावादाच्या सावलीत वाढलेली मुलं नि फुलं पाहिल्यानंतर जर “मी सोविएत देश पाहिला नसता तर माझ्या जीवनात एक फार मोठी पोकळी राहून गेली असती.” असे ते म्हणतात. 
 स्वतः अण्णा भाऊंना शाळे पासून दुर रहावं लागलंनिरक्षतेने त्यांच्या जिवनातला मोठा कालखंड गेला होता. शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते, त्यामुळे शाळा, विश्वविद्यालये पाहताना त्यांना भेटलेल्या एका मास्तरांना त्यांनी प्रश्न केला, ´तुमच्या देशात निरक्षतेचे प्रमाण किती आहे..!´  त्यावर ते प्रमाण ´सात टक्के´ असल्याचे त्या मास्तरांनी सांगितले पुढे अण्णा भाऊ दुसरा प्रश्न मास्तरांना करतात ´हे सात टक्के अडाणी का राहून गेले…!´  त्यावर त्या मास्तरांचा त्यावर जबर खूलासा आला त्यावा अण्णा भाऊ चाट पडले.  ते उत्तर होते, “हे सात टक्के लोक अडाणी आहेत त्याचं कारण त्यांना चालता येत नाही. 

काही लोक पाळण्यात आराम करीत आहेत, तरी काही आईच्या  पोटात आहेत.” कम्युनिस्ट देशात साक्षरतेचे प्रमाण 100टक्के असल्याचे हे वेगळे उत्तर होते.  अण्णा भाऊ स्वतः भारतीय शिक्षण व्यवस्थेचे शिकार झाले होते.  त्यामुळे त्यांना हे उत्तर चाट करणारे होते.  त्यामुळे अण्णा भाऊ म्हणतात, “रशियात शिक्षणाची नदीच वाहत आहे.  आणि माणसांना विद्येचे वेड लागले आहे.  म्हणूनच प्रगतीनं त्यांचा पदर धरला आहे.  फुलं, मुलं, फळं नि माणूस समान पातळीवर असून तिथं जीवनात मुळीच विसंगती उरलेली नाही.”   समतेचे महत्व लक्षात आनून देत, असमतेवर आधारलेला समाज, विद्येला, विवेकवादाला, माणूसपणाला व निसर्गाने दिलेल्या समतेच्या विचारांनाही नकारत असल्याचे ते त्यांच्या शब्दांतून मांडतात.
अण्णा भाऊ कम्युनिस्ट असल्याने दारिद्याच्या विरोधाती लढाईचे ते नेते होते.  देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही ये आझादी झूटी है, देश की जनता भूकी है असा नारा देणार्या अण्णा भाऊंना दारिद्र्याचा तिटकारा होता.  देशात कष्टकर्यांची गरिबी संपावी देश, महाराष्ट्र सुखी, संपन्न व्हावा असे स्वप्न उराठी बागळगणारा हा काॅम्रेड स्वतःने स्विकारलेला कम्युनिस्ट विचार कोणाला दारिद्र्यात तर ठेवत नाहीना याची डोळस-विवेकी तपासणी समाजवादी रशियात जावून करतात, ते म्हणतात, “मी जर रशियान प्रगतीचे आकडे जमवले असते तर मला वाटते, एक डोंगरच उभा झाला असता.  म्हणून आकड्यांची वाट धरली नाही.  फक्त पाहत होतो.  जपून बोल होतो.  मी समाजवादाचं यश पाहत होतो नि अपयशही हुडकीत होतो.  ऐश्वर्याबरोबर दारिद्र्यही मी शोधीत होतो.  परंतु मला ते दारिद्र्य दिसत नव्हते.  दारिद्र्य हे दडत नसतं.
 एखादी लबाड सत्ता डोंगराऐवढे सतय दडवू शकेल, परंतु तिला दारिद्र्य हे मुळीच दडवता येणार नाही, असं माझं मत आहे नि ते खरं आहे, असा माझा दावा आहे.
 कारण दारिद्र्य हे फार क्रुर असते नि ते नग्न असते.  त्याच्या खुणा माणसाच्या मनावर, ह्दयावर, नि चेहर्यावर शुध्द उमटलेल्या दिसतात.  त्या दडणे शक्य नाही.  शिवाय दारिद्र्याच्या त्या खुणा माणसाच्या वस्त्रांवर उमटलेल्या असतात.  त्या म्हणजे कड्यावरील जुनी ठिगळं नि फाटक्या कापडांना घातलेले टाके ह्या होत.  या खुणा कुणीच दडवू शकणार नाही. 
 मी रशियात या खुणा पाहण्याची पराकाष्ठा करीत होतो.  परंतु अखेरपर्यंत मला ठिगळं लावलेले कापड कुणाच्या अंगात दिसले नाही.  म्हणूनच मी निर्भयपणे सांगू शकतो की, सोविएत संघराज्यात दारिद्र्याचे नावही उरलेले नाही.  महान ऑक्टोबर क्रांतीनं तो क्रुर शब्दच तिथं जाळून टाकला आहे.  म्हणूनच त्यांच्या प्रगतीची भरारी गगनाला भिडत आहे.” या भावना व्यक्त करून अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट देशाचे यशचं त्यांच्या शब्दांतून मांडून टाकले आहे.
 बाकू शहराचा अर्थ अग्नी असा अणार्या बाकू शहराकडे अण्णा भाऊंचा प्रवास सुरू होतो.  समुद्राच्या
शेजारी असणार्या या  शहरा बद्दल अण्णा भाऊंनी बरेच वर्णन केले आहे. ते आकाशातील इंदृधनुष्शाशी तूलना बाकू शहराशी करतात.  अण्णा भाऊंच्या स्वागतासाठी तेथे असणार्या हमीदसाहेबांना अण्णाभाऊ म्हणतात, “तूम्ही श्रीमंत आहात.”  त्यावर हमीदसाहेबांनी दिलेलं उत्तर हे अगदी त्यांच्या शहरासारखंच सुंदर आहे ते म्हणतात, “तूम्ही आम्हाला श्रीमंत म्हणू नका तूम्ही आम्हाला आझाद म्हणा!” त्यावर अण्णा भाऊ म्हणतात, “म्हणजेच तुम्ही वैभवशाली आहात नि म्हणून तुम्ही वैभवशाली आहात.”  हे वाक्य इतकं ताकदीचं झालं की, त्याची दखल तेथील रेडीओवर घेतली गेली.  या प्रवासवर्णणात तेलविहरींच्या या शरातील समुद्रातून कसे तेल काढले जाते याचा संघर्ष मांडतात.  अण्णा भाऊ तेथील मशीदी मध्ये जातात तेव्हा तेथील काझी भारतातील मुस्लीमांना अभिवादन सांगतात.  कित्येक मुस्लीम समाजबांधव तेथे नमाज अदा करण्यासाठी आलेले पाहून रशियाद धार्मीक विधींना बंदी नासल्याचे अण्णा भाऊ पाहतात.  मशीदीमध्ये अण्णा भाऊंना धर्मनिरपेक्षतेचे दर्शन होते.  रशियन माणसे काम करताना ते सोपे होईल याकडे लक्ष देत असल्याचा दाखला मिळतो. 
 अण्णा भाऊंनी भारतात बेरोजगारांचे लोंढे पाहिले होते.  बेराजेगारी किती भयानक असते याची जाणीव हि त्यांना होती.  त्यामुळे कम्युनिस्ट देशात बेरोजगार दिसतो याचा शोध घेताना त्यांना भेटलेला एक मनुष्य अण्णा भाऊंना उत्तर देतो ते असे, “आमच्या देशात तुम्हाला औशधालाही बेकार मिळणार नाही.  इथं समाजवाद आहे.”
 समाजवादी सामुदाईक शेती हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो.  आपल्या देशातही तो राहिलेला आहे.  जमीनीचे फेरवाटप असेल, सिलींगचा कायदा असेल, शेतीमुळे आलेली गरीबी असेले, शेतमाला नसलेला भाव असेल, एकीकडे आपला माल विमानाने परदेशी पाठवणारा शेतकरी तर दुसर्या बाजूला शेतमाला भाव न आल्याने वेडा झालेला शेतकरी असेल, कर्जाच्या बोझ्याने शेतकरी आत्महत्या असतील, जमीनीच्या तुकड्यांवररून पडलेले खून असतील हे सर्व शेतीसंबंधाने चर्चेचा विषय बनल्या आहेत.  अण्णा भाऊंनी सोवियतसंघराज्यात पाहिलेली सामुदायिक शेती पाहणे महत्वाचे ठरते.  सामुदाईक शेतीबाबत अण्णा भाऊ म्हणतात, “तो सामुदाईक मळा पाहून झाल्यानंतर मी एका दुमजली घरात शिरलो.  माझ्या मागून सर्वच मंडळी आली.  ते एक शेतकर्याचे घर होते.  तिथं दहा माणसं राहत होती.  त्यापैकी पाच शेतीवर काम करीत होती नि पाच मुलं शळा शिकत होती.  या घरात मला देान रेडिओ, एक टेलिव्हिजन नि एक टेलिफोन दिसला, प्रत्येकाची निराळी खोली, पलंग, गाद्या, आरसे वगैरे पाहून मला आमच्या इकडच्या जुन्या सरदाराच्या ऐश्वर्याची आठवण झाली.

 रशियात मला सर्वत्र असाच अनुभव आला.  कुठंही जीवात विसंगती दिसली नाही.  सर्वत्र जीवन एका पातळीवर उभं आहे आणि सारखं फुलत आहे.  या दौर्यात मी विमान, रेल्वे, मोटार आणि पाय सर्व साधनांचा वापर केला आणि तो महान देश पाहिला.  मला आनंदी, स्वच्छंदी, नम्र नि शहाणी माणसं भेटली.  ताष्कंद ते बाकू हे अंतर फार मोठे आहे निक ते आंतर कापीत मी जात होतो.  परंतु मला एकही दुर्बल निकामी, भिकारी, उपाशी आळीश असा माणूस दिसला नाही.  याचं कारण समाजवादं.
 …….दुसर्या दिवशी ताष्कंदजवळ असलेले ´स्तालिन सामुदायिक शेत´ पाहिलं.  तो सामुदायिक मळा म्हणजे एक वेगळे राज्यच आहे आकणते एक प्रकारचे आश्चर्यही आहे.  कारण मळ्याची स्थापना 1929 साली झाली, त्यावेळी फक्त तीनषे तीस एकर जमीन या मळ्याच्या मालकीची होती.  1934 साली या मळ्यात फक्त दोन ट्रक्टर काम करीत होते.  परंतु आज एक हजार पाचशे हेक्टर जमीन या मळ्याच्या मालकीची असून, आता चैतीस ट्रक्टर कामी करीत आहेत.  तेथे सध्या 1104 शेतकरी कामा करीत असून, त्यापैकी 475 स्त्रिया आहेत.  या मळ्यात चार शाळा आहेत.  दाने हजार पाचशे कोंबड्या रोज मळ्यात अंड्यांचा ढीग लावीत आहेत.  आकराशे पाळीव गायींचे दूध काढण्यासाठी तेथे निराळे दूधकेंद्र निर्माण करण्यात आलेअ सून, एकाच वेळी 16 गायी स्वखुशीने येऊन दून देत असतात.  त्या मळ्यात 13 दूध काढणारी यंत्रे बसविली असून, गायी रांग लावून दूध देत असतात.  या मळ्याच्या मालकीची सात हाजार पाचशे मेंढरे असून, त्या भागात तीनशे पंचाहत्तर घरे आहेत आणि मालाची ने-आण करण्यासाठी वीस मोटार ट्रक्स रोज पळापळा करत आहेत.  शिवाय हायस्कूल, दवाखाना, जनावरांचा दवाखाना, प्रसुतिग्रह, वगैरे सर्व पाहिलं की, माणसाची मती गुंग होऊन जाते.” अस सुंदर वर्णन ते त्या समाजाचं करतात व समाजवादामुळं निर्माण झालेल्या सामुदाईक शेती व समाजवादाचं महत्व लक्षात आणून देतात. 
 त्यामूळं समाजवादाकडं जाण्याची गडबड अण्णा भाऊंना झालेली होती, म्हणून ते म्हणतात,

दौलतीच्या राजा उठून सर्जा
 हाक दे शेजार्याला रे शिवारी चलाll
संदी लई नामी आलीया अवंदा
सावकारशाहीचा विखारी कुंदा
आरपार खुरपून पाडायचा रेंदा
दाखवाया बळा-उचल घे इळा
पोलादी पाजळून आपला रे शिवारी चलाll”

अण्णा अण्णा भाऊंचा प्रवास हा 1960 सालचा आहे.  भारतात 2020साली नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणाचा स्विकार करून अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्स आले होते.  त्यावेळी त्यांचा नियोजित असा गुजरात दौरा ठरला होता.  तेव्हा गुजरात शहरातील गरीबांची वस्ती दिसू नये म्हणून मोठ मोठाल्या भिंती बांधून घेतल्या होत्या व त्यांची चर्चा टिव्ही व सामाजिक माध्यमांवर जोराने झाली होती.  भांडवली व्यवस्थेला पायघड्या आंथरलेला देशात गरीबी लपवली जात असल्याचे हे दैनिय चित्र आहे.  यावेळी अण्णा भाऊंनी सांगितलेल्या समाजवादाची किती गरज आपल्या देशाला आजही हे लक्षात येते. 
 श्रमाला धर्म म्हणून स्विकारलेल्या रशियातील माणसं कलेची कदर असल्याचे देखील अण्णा भाऊंनी पाहिले होते.  अण्णा भाऊ तेथं पाहिलेल्या नाटकाचं वर्णन करतात.  भयंकर बुरखा पध्दती असणारा देशात उशीराने समाजवादी रशियात सामील झाल्यांनतर तेथील असणार प्रगती, व त्या घटकराज्याच्या अध्यक्षपदी एक स्त्री असल्याचे त्यांना कौतून वाटते.  त्या देशातील एकूण एक माणूस साक्षरतेच असल्याची नोंद करतात.
 साम्राज्यवादी देशांच्या हात्यारांच्या उद्योगांना चालणा मिळावी, मंदीच्या चिखलात चाललेले भांडवली व्यवस्थेचे चाक बाहेर निघावे यासाठी काही देशांना आंतराष्ट्रीय पातळीवर युध्द व्हावी अशी अपेक्षा असते.  सिमावाद तिव्र व्हावे व युध्दजन्य परस्थीती निर्माण व्हावी यातून हत्यारांची खरेदी वाढते व साम्राज्यवदी भांडवली देश श्रीमंत होतात हे हत्यारांचे राजकारण अण्णा भाऊ तारूण होते.  त्यामुळे रशियामध्ये चाललेला शांततेचा जयघोष अण्णा भाऊंच्या मनाला भावणारा होता.  गरिब राष्ट्रंना युध्द परवडणारी नसतात याची जाणीव समाजवादी रशियाला असल्याने ते जगात शांतता नांदवी यासाठी तो देश पुढाकार घेत असल्याचे ते चित्र होते.

 अण्णा भाऊ साठे स्वतः संपूर्ण हयात कम्युनिस्ट होते.  त्यांनी स्विकारलेला विचारासाठी ते दिनरात्र एक करून झिजत होते, भारतात समाजवाद यासाठी ते जिवाचं रान करत होते.  त्यामुळे त्यांना समाजवादा बद्दल तिव्र ओढ प्रेम होते आणि ते त्यांनी रशियामध्ये जावून पाहिल्यानंतर थक्क हि झाले.  ते म्हणतात, “सोविएत रषियात मी त्या रशियन जनतेच्या जीवनाचे अनेक पदर पाहिले.  तिचा अपार उद्योग, तिची विव्दत्ता आणि कला, साहित्य आणि उदत्त संस्कृती हे सर्व पाहून मन थक्क झालं.”

 अण्णा भाऊंनी रशियात मॉस्को, लेनिनग्राड, स्टालिनग्राड, बाकू, आझरबैझान, ताश्कंद ते दिल्ली असा प्रवास केला. शेवटी दिल्लीच्या प्रवासाला लागताना अण्णा भाऊंना गलबलून येतं  या संपूर्ण प्रवासात ते सोवित रशियात दिसलेल्या समाजवादाचं, कष्टकरी वर्गाने स्विकारलेल्या कम्युनिस्ट विचारधारेचे कौतूक करीत राहता.  या निमित्ताने असे सांगावे वाटते की, अण्णा भाऊंच समाजवादं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जाणे हेच 100व्या जयंती निमीत्ताने केलेले अभिवादन असेल.

लेखक – प्रविण मस्तुद 
सचिव ,भारतीय कमुनिट्स पक्ष ,सोलापूर  
ईमेल – [email protected] 

संदर्भ –1. संपादक मंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मय, मुंबई 400 032, सचिव, महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृति मंडळ, 1 ऑगस्ट 1998.

2. संपादक, अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या, मुंबई 400 025, लोवाड्मय गृह, जुलै 2010.

One thought on “वाटेगाव ते रशिया – अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांचा प्रवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *