AgricultureBreaking News

वाघोली येथे जागतिक मृदा दिन साजरा ,शिवार संसद कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उस्मानाबाद :- गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात शिवार संसद चे काम प्रगतिपथावर सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना चळवळीशी जोडून घेणे सुरू आहे.

आज जागतिक मृदा दिनानिमित्त  मौजे वाघोली ता. उस्मानाबाद येथे सकाळी शेतकऱ्यांना एकत्र करून जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. मातीचे आरोग्य सांभाळणे किती गरजेचे आहे, मातीतील सेंद्रिय कार्बन वाढवणे तसेच माती परीक्षण करून घेणे किती गरजेचे आहे याविषयी शिवार फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री अशोक कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गातील वेगवेगळे जैविक घटक वापरून इथून पुढे आम्ही जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन शेतकऱ्यांनी दिले. यावेळी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

     

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!