Breaking News

वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेचे मंथन प्रज्ञाशोध परिक्षेमध्ये घवघवीत यश

पंढरपुर/नामदेव लकडे -फेब्रुवारी, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेमध्ये वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेतील विध्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविलेबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचेहस्ते बक्षिस देवुन, सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेमध्ये वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेतील ५ विध्यार्थ्यानी यश मिळविले  या परिक्षेत यामध्ये कु.प्राजक्ता शिंदे व कु.रेहान मुलाणी इ. र री यांनी राज्यात पाचवा, सालेहा सय्यद केंद्रात 2 री, कु.अथर्व शिंदे इ.4 थी केंद्रात पहिला क्रमांक तर पृथ्वीराज जाधव इ.3 री याने केंद्रात चौथा क्रमांक मिळविला.
यावेळी सचिव बाळासाहेब काळेगुरुजी,प्राचार्य जमदाडेसर, कारखान्याचे सेक्रेटरी एम.आर.मदारखान, संस्थेचे सचिव चंद्रहास गायकवाड, नानासो जाधव, पालक कुमार शिंदे, नानासो जाधव, मुख्याध्यापक संजय काळे, शिक्षक सुहास चौगुले, पल्लवी काळे, आबासो जाधव, नागनाथ जाधव, सचिन काळे, अतुल गायकवाड, इऱफान शेख, उपस्थित राहुन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन, शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना  सहशिक्षिका काळे पी.पी. व मुख्याध्यापक एस.एल.काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!