Headlines

वलगुड मध्ये पिक विमा ॲप वापरण्याचे प्रशिक्षण-शिवार संसद चा स्तुत्य उपक्रम

उस्मानाबाद:-जिल्ह्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनी कडे ऑनलाईन अर्ज ॲप मध्ये भरण्याची बळीराजाची लगभग सुरू आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येत आहेत. खूप शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांनाही वापरायला अडचणी येत आहेत. नेमके अॅप कसे वापरायचे याचे दूरध्वनी शिवार हेल्पलाइनवर येऊ लागले. या अडचणीवर कशी मात करता येईल याचा विचार करून शिवार हेल्पलाइन व उमेश घाडगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोप्प्या शब्दात व्हिडिओ ही जिल्ह्यातील समाज माध्यमातून प्रसारित केला गेला, त्याचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा ही झाला आहे.तसेच तात्काळ वेळेची गरज ओळखून जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी वलगुड (ता. उस्मानाबद) गावात जाऊन तरुण शेतकऱ्यांना एकत्र केले व ॲपमध्ये नुकसानीचा दावा कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले. यावेळी गावातील तरुण शेतकरी आवर्जून उपस्थित होते. आम्ही अॅप वापरायचे शिकू व गावातील इतर शेतकऱ्यांना वापरण्यासाठी मदत करू असे आश्वासन गावकऱ्यांनी दिले आहे. नुकसानभरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply