yuva sanvaad

वर्तमानचे माझे दैवत;डॉक्टर,पोलिस आणि सफाई कामगार

 कोरोना जाऊ दे , म्हणून प्रत्येक जण आज प्रार्थना करतोय
प्रत्येकाच्या मनात आणं प्रत्येकाच्या ध्यानात फक्त कोरोनाचं

एकीच बळ आता कामाच न्हाय 
प्रत्येकाने घरात बसून कोरोनाला थांबवायचं

कोरोनाच्या धास्तीने आता जनता ग्रासली
केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या नियमांनचे पालन करु
आणं आपल्या भारतातून आपण कोरोनाला दुर करु

डॉक्टरच्या प्रयत्नाने कोरोना दुर ओहो 
चोवीस तास सेवा करुन, कोरोनाशी झुंज देणारा डॉक्टर
आज माझ्यासाठी वर्तमानचे माझे दैवत डॉक्टर

गर्दीला आज आळा घालण्यासाठी वर्दीचा पुढाकार
ना वेळेच भान , ना स्वतःच्या जिवाची पर्वा 
जनतेच्या सेवेसाठी पोलिस प्रशासन सज्ज आज
आज माझ्यासाठी वर्तमानचे माझे दैवत पोलिस

उजडल्या पासून ते सुर्य मावळे पर्यंत 
स्वतःच्या जिवा पेक्षा त्याला स्वच्छता प्रिय असणारा तो सफाई कामगार
आज माझ्यासाठी वर्तमानचे माझे दैवत सफाई कामगार

डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार यांच्या प्रयत्नाना बळ येवो हिच प्रार्थना 

आणं आज खरचं माझ्यासाठी नवे
तर सर्वांसाठी वर्तमानचे दैवत 
डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार आहेत.
                  नाव: रविशंकर लता गुरुनाथ जमदाडे
                  मु.पो.तावशी ता.पंढरपूर जि.सोलापूर 
                  मोबाइल नंबर: 9763632750

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!