वंजारी सेवा संघाच्या वतीने ओबीसी भटक्या-विमुक्ताच्या हक्कासाठी निवेदन

प्रतीनिधी /बालाजी सोसे- महाज्योती बचाव कृती समितीच्या वतीने आज 6 ऑक्टोंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्र व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन होत आहे. “वंजारी सेवा संघ महाराष्ट्र “म्हणून आपण त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. कारण हा विषय सर्व भटक्या विमुक्त यांच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे .यासाठी आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

आज वंजारी सेवा संघ बुलढाणा च्या वतीने सिंदखेडराजा तहसीलदार तहसील कार्यालय सिंदखेड राजा आज निवेदन देण्यात आले.(१) OBC.VJNT व SBC विद्यार्थ्यांच्या हितार्थ स्थापन केलेल्या महाज्योती संस्थेला भरावी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. (२) त्यामध्ये भटक्या विक्तीच्या समस्या तातडीने मार्गी लावणे बाबत .यावेळी वंजारी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. गजानन राव घुले ,मा .संदीप राव जायभाये ,मा. संतोष डोईफोडे मा .सुभाष मुंडे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते‌.

Leave a Reply