Breaking NewsPolitics

वंचित च्या मंदिर प्रवेश आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा पाठिंबा

प्रतींनिधी / मंगळवेढा – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन  आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आमिर आतार यांनी सांगितले आहे . शासनाकडून कोरोणाच्या राष्ट्र भूमीवर जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकाचे मंदिरांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकत असलेले फुले-फळे याला मार्केट मिळत नाही त्याचबरोबर नारळ कळते उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होत आहे पंढरपूर शहरातील छोटे-मोठे सर्वसामान्य व्यापारी यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ढासळले आहे कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा  यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती   शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज वडघुले साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटक आमीर आतार यांनी दिली आहे 31 तारखेला आंदोलनात शेतकरी . व व्यापारी  सोबत घेऊन सहभागी होणार असल्याचे आव्हान आमिर अत्तार  यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!