वंचित च्या नेत्या सौ सविताताई मुंडे शेतकर्‍यांच्या बांधावर

 

वंचित बहुजन महिला प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सौ सविताताई शिवाजी मुंडे यांनी हिवरखेड पूर्णा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन साधना संवाद

सिंदखेड राजा/बालाजी सोसे -सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस वाऱ्यामुळे झालेल्या शेतीचं नुकसान पाहणी करण्यासाठी काल आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सौ सविताताई शिवाजी मुंडे यांनी हिवरखेड पूर्णा याठिकाणी  शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन भेट घेतली .आणि पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद  साधला  ताई यांनी शेतकऱ्याला त्वरित मदत द्यावी .अशी मागणी व विनंती केली .आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या मतदार संघाकडे थोडे लक्ष द्यावे अशी त्यांनी त्याठिकाणी विनंती केली. त्यावेळेस उपस्थित शेतकरी वसंत वाघमारे आणि बाबासाहेब कुठे जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply