Headlines

लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या -भाकपा

बार्शी / अब्दुल शेख – भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 1 ऑगष्ट 2020 रोजी काॅम्रेड अण्णा भाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी पक्षाच्या कार्यकत्यांनी अभिवादनाच्या घोषणा दिल्या व अण्णा भाऊंना भारतरत्न पुस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली.  यावेळी अभिवादनपर भाषणे झाली.

यानंतर अण्णा भाऊंना भारतरत्न पुस्काराने सन्मानित करण्याच्या मागणीचे निवेदन , मा. पंतप्रधान यांना मा. तहसिलदार यांचे मार्फत भा. कम्युनिस्ट पक्षाने दिले.  हे निवेदन  मा. नायब तहसिलदार मुंढे यांनी स्विकारले.  हे निवेदण भा. कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.

निवेदनात  म्हणले आहे, लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे सर्व साहित्य नाही रे वर्गाला,  महिला अन् दलित, आदिवासींना प्रेरणा देणारे आहे.   या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाला केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,  अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एकमताने संमत केला आहे. 

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अतिशय महत्वाची भागिदारी केली आहे, शाहीर अमरशेख व शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत काम केले.  साहित्याच्या क्षेत्रात अण्णाभाऊंनी जवळपास 35 कादंबर्या, 13 कथासंग्रह, 3 नाटके, 14 लोकनाट्ये, 10 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि कितीतरी शाहीरी कवने लिहली, 7 कादंबर्यांवर मराठी चित्रपटही निघाले आहेत, अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या सामर्थ्यावर दिलेले समाजासाठीचे योगदान लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या 101 व्या जयंती वर्षात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्राकडे याबाबत खंबीरपणे शिफारस करावी, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड पवन आहिरे, काॅम्रेड भारत भोसले, काॅम्रेड बालाजी शितोळे, जयवंत आमले, शुभम शितोळे, काॅम्रेड  प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *