लोकसहभागातून खंडाळी येथील स्मशानभूमीचा केला जात आहे विकास

ऑगस्ट महिन्यामध्ये खंडाळी येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून त्यास जैविक कुंपण बसवल होतेे. गावातील सार्वजनिक कामासाठी प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी आव्हान केल्यानंतर गावाचा शाश्वत विकास कशामध्ये आहे या गोष्टी सर्वांच्या लक्षात येत आहेत. आज श्री. वंसतराव बाबासाहेब पौळ *  बजाज यांनी अँड विजयकुमार शेळके* यांनी  स्मशानभूमी येथे बसण्यासाठी बैठकी सीट बसवल्या आहेत.  याप्रसंगी  चेरमन श्री. व्यंकट पाटील , श्री.मोतीराम पौळ श्री. माधव  माने, श्री.नवनाथ पौळ  मेघराज पौळ,  पापा मिठापुरे  ,कालु रजाक शेख ,प्रा. दशरथ पौळ, यांची उपस्थिती होती.  अशा पद्धतीने सर्वांनी वस्तू व कामाच्या स्वरूपात योगदान दिले तर नक्कीच हळूहळू का होईना परिवर्तन होत जाईल  गावातील सर्व मंडळी सार्वजनिक कामात लोकसहभाग नोंदवत स्वेच्छेने नोंदवत आहेत हीच गोष्ट खंडाळी करासाठी अभिमानाची आहे.

गावातील सर्व मंडळी सार्वजनिक कामात लोकसहभाग नोंदवणार नाहीत तो पर्यंत सरकारी कामात पारदर्शकपणा व गतिशीलता  येणार नाही. गावकरी स्वता कामसाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत तरी सरकारने देखील दहा पाऊले पुढे ठेवून कामे करावी हिच अपेक्षा गावकरी व्यक्त केली आहे.

Leave a Reply