Headlines

लॉकडाऊनच्या काळातील दिलेली 2 हजार मदत उचल म्हणून कपातीला लाल बावटा विडी कामगार युनियनचा तीव्र विरोध !

 

बोनस व हक्करजा मधून 2 हजार कपात केल्यास तीव्र आंदोलन करणार – नसीमा शेख

सोलापूर/दत्ता चव्हाण दसरा दिवाळी सणाच्या निमित्ताने विडी कारखानदार आपल्या विडी कामगारांना दरवर्षी  बोनस, हक्करजा अदा करण्यात येते.यंदा लॉकडाऊनच्या काळात विडी कामगारांना 2000 /-  दोन हजार रुपयांची मदत दिली होती ती मदत आज कामगारांच्या नावे उचल टाकून बत्तीन विडी वर्कर्स व अन्य  काही कारखानदार सक्तीने बोनस व हक्करजा मधून वसूल करत आहेत.ती त्वरित थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती विडी कामगार नेत्या माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी दिली. 

गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांना बोनस व हक्करजा मधून लॉकडाऊनच्या काळात मदत म्हणून दिलेले 2 हजार रुपये कपात करू नये या मागण्याचे निवेदन शिष्टमंडळामार्फत देण्यात आले.या शिष्टमंडळात माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते, गंगुबाई कणकी, जलालाबी शेख आदी उपस्थित होते. 

या निवेदनात म्हटले आहे की, 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे विडी कामगारांची उपासमार होत होती. त्या काळात मा. केंद्र सरकारने सर्व आस्थापनांनी या काळात कामगार कामावर आहेत असे गृहीत धरून त्यांचे वेतन अदा केले पाहिजे असे सूचित केले होते.  

त्या काळात आमच्या युनियनच्या वतीने झालेल्या पाठपुराव्याच्या आधारावर आपण व मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी विडी अस्थापना मालकांना विडी कामगारांचे लॉकडाऊन काळातील वेतन अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे संबंधितानी सुरुवातीला रु. १००० व त्यानंतर रु. १००० असे रु. २००० त्यांच्या कामगारांच्या खात्यावर जमा केले. होते. त्याबद्दल कामगार व त्यांच्या संघटनांनी सर्वांचे आभार व्यक्त केले होते आणि ऐन सणात अशी आठमुठी भूमिका कारखानदार घेत आहेत हे लाल बावटा कामगार युनियन कमी मान्य करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *