Headlines

लॉकडाउन च्या कालावधीत द्राक्ष बागायत मजुरांना बाहेर गावी कामाला जाण्याची परवानगी द्या – सूर्यकांत चिकणे

बार्शी /अब्दुल शेख – सोलापूर जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन च्या कालावधीत द्राक्ष बागायत मजुरांना बाहेर गावी कामाला जाण्याची परवानगी मिळावी ,अशी मागणी सूर्यकांत चिकणे यांनी मा.मुख्यमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे .भैरवनाथ शेतमजुर सघटनेने म्हटले आहे की जर मजूर बाहेरगावी कामाला गेला नाही टीआर त्याच्या रोजिरोटीचा प्रश्न निर्माण होईल.अशा परिस्थितीत महिलांनी बचत गटाचे हफ्ते कसे भरायचे.सावकारकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार. घरखर्च कसा भागवावा ,घरातील कोणी व्यक्ति आजारी पडली तर दवाखाण्याचा खर्च कसा भागवावा, असे अनेक प्रश्न बाहेरगावी कामाला जाणार्‍या मजुरांसमोर आ वासून उभे आहेत.

शेतमजुर बाहेर गावी कामाला जाताना सामाजिक अंतर राखू तसेच मास्क व सानिटायजर चा वापर करू.पण आम्हा शेत मजुरांना बाहेर गावी कामास जाण्याची परवानगी मिळावी.शेतकरी जगला तर सगळे जिवंत राहणार आहेत म्हणुन वरील मागणी चा विचार करावा अथवा आम्ही लोकशाही पधतीने व गांधीगीरी पधतीने आदोलन करणार आहोत.अशी माहिती भैरवनाथ शेतमजुर सघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी दिली.

Leave a Reply