Headlines

लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

 

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मा. स्वामी सर यांना वाढीव मोबदला ,विमा संरक्षण, कोरोना सर्वे यावर चर्चा करून  निवेदन देताना आशा सेविका व गटप्रवर्तक 

बार्शी /प्रतिनिधी- दि 11 मे रोजी महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आशा व गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने मागणी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आशा गटप्रवर्तक व सेविका यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी व नोडल ऑफिसर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

सद्यपरिस्थितीत कोरोना  महामारीचा पादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढलेला असून मागील लाटेपेक्षा यावर्षी कोरोनाने बाधित व मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासनाने कडक निर्बंध ही लागू केले आहेत. शिवाय सार्वत्रिक लसीकरण मोहीम ही सुरू केली असून या मोहिमेत आशा व गटप्रवर्तकांना ही सामील करून घेतले आहे. 

      

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.आशा सेविका व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे. शासकीय कर्मचारी म्हणुन दर्जा देण्यात यावा . सामाजिक सुरक्षा,पेन्शन, मेडीकेल्म योजना लागु करण्यात यावी.४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागु करण्यात यावे .ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा 1000 रु प्रोत्साहन भत्ता मंजूर करणयात यावा.कोवीड लसीकरण ड्युटी आशांना  बंधनकारक नाही तरीही ड्युटी लावण्यात येत आहे,त्यासाठी मानधनाची विषेश तरतुद करण्यात यावी.

 महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आशांना 2000 ₹ व गटप्रवर्तकांना 3000 ₹ चा मागील पाच महिन्यापासून थकीत असलेला  वाढीव मोबदला त्वरित अदा करण्यात यावा.कुष्ठरोग, क्षयरोग, व इतर थकीत सर्व मोबदला त्वरित अदा करण्यात यावा.आशा व गटप्रवर्तकांना मास्क, ग्लोज, सॅनिटायझर ची पूर्तता नियमित करावी . ऑक्सिजन व तापमान मीटर यंत्रसाठी आवश्यक असणारे सेल ही मुबलक प्रमाणात देण्यात यावेत.

आशांना कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण दिलेले नसताना कोरोना तपासणीची कामे लावण्यात येऊ नये.कोरोनाच्या कामासाठी आशा व गटप्रवर्तकांना प्रतिदिन 300 रु मोबदला देण्यात यावा.कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या  आशा व गट प्रवर्तकांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारी अथवा खाजगी दवाखान्यात बेडची सोय व मोफत उपचारांची सुविधा करण्यात यावी. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा मंजूर करण्यात आला आहे, परंतु या संदर्भातील कार्यवाही मात्र आपल्या जिल्ह्यात झालेली दिसून येत नाही.तरी आपल्या स्तरावरून त्वरित आदेश काढून विम्याचे फॉर्म भरून घेऊन पुढील कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात यावेत. 

मागण्या मान्य न झाल्यास दि 24 मे रोजी एक दिवसीय संप करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला दिला आहे. यावेळी श्रीमती पौळ एस. जी,  वैशाली कुलकर्णी , वर्षा नरखेडे, ज्योती हजारे व आशा सेविका कविता ननावरे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *