लाडोळे तलावाचा कॅनोल फुटून पाण्यामुळे झालेल्या नुकसान पंचनामे करून भरपाई मिळावी

बार्शी –  लाडोळे  तलावाचा  कॅनोल फुटून पाणी शेतात घुसल्यामुळे सासुरे येथील शेतकरी जालिंदर साहेबराव आवारे व सत्यवान साहेबराव आवारे यांच्या जमीन गट नं 1 मधिल जमीन वाहुन गेली व मोठ मोठ्या तालीफुटून नुकसान झालं आहे.कांदा, सोयाबीन पिक वाहुन गेले आहे.त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी व फुटलेला कॅनोल तात्काळ दुरूस्ती कराण्यासाठी शाखा अभियंता यांनी त्यांच्या स्तरावरुन कार्यवाही करावी ,अशी मागणी जालिंदर साहेबराव आवारे, सत्यवान साहेबराव आवारे व इच्छांत सत्यवान आवारे यांनी शाखा अभियंता,पाटबंधारे उप विभाग बार्शी यांच्याकडे केली आहे. 

Leave a Reply