Headlines

” लस घेतल्याने दंडाला वस्तू चिकटण्याचा प्रकार फसवा”

 


       

जनतेनी फसव्या  चमत्कारावर विश्वास ठेवू नये. म.अंनिस च्या सत्यशोधन समितीचे आवाहन


कोव्हिशील्ड लसीमुळे हातामध्ये चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत म.अंनिसच्या सत्यशोधन समितीने खालील निष्कर्ष काढले आहेत.

कोव्हिशिल्डची लस जेथे दंडात टोचली तेथून ती रक्ताद्वारे शरीरभर प्रसार पसरते. त्यामुळे त्या लसीचा परिणाम चुंबकत्व निर्माण करण्यात असेल तर सर्व शरीर चुंबक बनले पाहिजे. व्हिडिओ मध्ये फक्त दंडाच्या आसपास स्टेनलेस स्टील च्या हलक्या वस्तू चिकटलेल्या दिसतात.  अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणताही असाधारण चमत्काराचा दावा तपासण्या पूर्वी संबंधित व्यक्तीने अंगाच्या आसपास काही वस्तू तर लपवल्या नाहीत ना,  किंवा कोणत्याही स्वरूपाचा चिकटणार पदार्थ लावला नाही ना ? हे नियंत्रित परिस्थितीत  तपासायला हवे. तसेच हा प्रयोग चिकित्सक लोकांसमोर करायला हवा. जादूगार ज्याप्रमाणे चमत्कारातील खोटेपणा उघड करतो तशीच ही तपासणी आहे. संबंधित व्यक्तीने काखे मध्ये किंवा शरीराच्या सानिध्यात चुंबक ठेवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या इतर व्यक्तींनी सुद्धा असे गुणधर्म दाखवायला हवेत. पण तशा बातम्या अजूनतरी कानावर नाहीत याचा अर्थ कोव्हिशील्डमुळे संबंधित व्यक्तीच्या अंगात असे गुणधर्म आले हे सिद्ध होत नाही. विज्ञानामध्ये केवळ एका घटनेवरून नियम सिद्ध होत नाहीत किंवा एखादी गोष्ट सत्य म्हणून सिद्ध होत नाही. 

प्रथमदर्शनी तरी व्यक्तीचा हात कोव्हिशील्डमुळे चुंबकीय बनला हे असत्य वाटते. स्टेनलेस स्टील हे चुंबकाला चिटकट नाही. चुंबकाला लोखंडी वस्तूच चिकटतात. व्हिडिओ मध्ये तर सर्व वस्तू स्टेनलेस स्टील दिसत आहेत. याचा अर्थ त्या चुंबकीय आकर्षक यामुळे चिटकत नसून त्यामागे इतर कारणे आहेत हे स्पष्ट होते.


महाराष्ट्र अंनिसच्या चमत्कार शोधन समितीने संबंधित व्यक्तीला भेटून अशी चिकित्सा केल्यास त्यातील फोलपणा उघड करता येईल.याला संबंधित व्यक्तीने व त्यांच्या कुटूंबियाने परवानगी दिल्यास म.अंनिस ची  सत्यशोधन करण्याची तयारी आहे. याबाबत सत्य व वैज्ञानिक कारण जनतेसमोर आणणे एवढाच हेतू असल्याचे म.अंनिसच्या राज्य  बुवाबाजी संघर्ष समितीचे सदस्य प्रशांत पोतदार  सातारा  नंदिनी जाधव  पुणे  केदारीनाध सुरवसे सोलापूर भगवान रणदिवे सातारा कमलाकर जमदाडे नांदेड मिलिंद देशमुख पुणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *