Breaking News

लग्नासाठी मुलगी देता का ? का शिधापत्रिका देता ?

प्रतींनिधी/जयकुमार सोनकांबळे – दिनांक 26 /11 /2020 रोजी पाटोदा जि. बीड तहसील कार्यालया समोर लग्ना साठी मुलगी देण्यात यावी, साठी आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले,

गोरगरीब वंचित समूहातील लोकांची या तहसील कार्यालयाकडून फसवणूक केली जात आहे, असेच पाटोदा तालुक्यातील गरीब कुटुंबातील अमित आगे हा विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला शैक्षणिक कामासाठी शीधापत्रिकेची गरज पडली आणि त्याने तहसील कार्यालयाकडे दिनांक 29 /9 /2020 रोजी शिधापत्रिका मिळण्यासाठी विनंती अर्ज केला परंतु संबंधित कार्यालयाने त्यांना पत्र देऊन सांगितले की एका व्यक्तीच्या नावाने शिधापत्रिका देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे व एक व्यक्तीही कुटुंबाच्या व्याख्येत बसत नाही. असे लेखी पत्र देऊन त्यांना शिधापत्रिका देण्याचे नाकारून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला होता,

त्यामुळे अमित आगे यांनी तहसील कार्यालयात पत्र देऊन एका व्यक्तीस शिधापत्रिका देता येत नाही असे कोणत्या कायद्यामध्ये आहे, अशी विचारणा केली असता तहसील कार्यालयाने या पत्रास कोणतेही उत्तर दिले नाही.म्हणून अमित आगे यांना एक सुंदर मुलगी लग्नासाठी पाहून तहसील कार्यालयाने माझा विवाह करून द्यावा. त्यामुळे तुमच्या कार्यालयाच्या व्याख्येत मी बसेन व मला शिधापत्रिका मिळून मी स्वतः धान्य दुकानातील माल घेण्यास पात्र ठरेल.

       तहसील कार्यालयाने लग्नासाठी एक सुंदर मुलगी पाहून विवाह लावून देण्यासाठी आज दिनांक 26/ 11/ 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत नवरदेव घोड्यावरती बसून वाजत-गाजत परण्या काढण्यात आला व तहसील कार्यालयाच्या समोर शिधापत्रिकेसाठी आंदोलन करण्यात आले.

 

वंचित बहुजन आघाडी ने पुकारलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव,आष्टी पंचायत समितीचे सदस्य मा. यशवंत भाऊ खंडागळे,व वंचित बहुजन आघाडीचे पाटोदा तालुका अध्यक्ष गोरख झेंड साहेब यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते,

        या आंदोलनाच्या वेळी बोलताना अॅड.डॉ. अरुण जाधव म्हणाले की मराठवाडा ही अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा शिधापत्रिकेसाठी या पाटोदा तहसील कार्यालयासमोर नवरदेव घेऊन एक आगळ्या- वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येत आहे, प्रशासनाकडे या गरजू विद्यार्थ्यांने शैक्षणिक कामासाठी फक्त शिधापत्रिका मागितली होती आणि तो अधिकार त्याला संविधानाने  दिला आहे,आणि तो अधिकार प्रशासनाला  नाकारता येणार नाही,

              तालुक्यांमध्ये याअगोदर चार ते पाच शिधापत्रिका एक व्यक्ती असणाऱ्यांना देण्यात आले आहे, त्याचा पुरावा आमच्याकडे आहे मग  अमितला का शिधापत्रिका देता येत नाही.तुम्ही भ्रष्टाचारी अधिकारी आहात, आणि आमचे हे आंदोलन कार्यालयासमोर आल्यानंतर एका तासामध्ये शिधापत्रिका देण्यात आली असा काय कायद्यात बदल तुम्ही केला,   तालुक्यातील अनेक लोकांच्या शिधापत्रिकांच्या अडचणी आहेत यापुढे एकाही व्यक्तीची तक्रार आली नाही पाहिजे, नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी.

यावेळी नवरदेव परण्या घोड्यावरती वाजत गाजत आला असताना तहसील कार्यालय परिसर दणाणून गेले होते.या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सचिन मेघडंबर, रमेश वारभुवन, खंडू यादव, सुभाष सोनवणे, वैजीनाथ केसकर, आबा पौळ, राहुल शिरोळे, सुनील जावळे, वसंत काळे, मामा नाईकवाडी,महादेव आगे, उमेश शिरसागर, सुनील शंकरराव जावळे,नितीन धनवटे आदींनी परिश्रम घेतले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!