Breaking News

रेशन दुकानदारांची मनमानी थांबवा – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने

वाशी/विशेष प्रतींनिधी – रेशन दुकानातून नागरिकांना प्रतीमहा प्रतिव्यक्ती येणारा माल पावतीसह द्यावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज वाशी तहसिल कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की रेशन वाटपात घोटाळ्याचे अनेक प्रकार वाचावयास एकायला मिळते  परंतु तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार नागरिकांसाठी आलेले धान्य पावतिसह देत नाहीत अशा अनेक तक्रारी कम्युनिस्ट पक्षाकडे येत आहेत म्हणून आज ही निदर्शने करण्यात आली . यामध्ये प्रतिमहा प्रतीव्यक्ती आलेले धान्य पावतीसह योग्य किंमत घेवून वितरित करावे, तसेच धान्य देण्यापूर्वी अंगठे घेऊ नयेत . पावती मिळत नसल्याने नागरिकांना कोणता माल कोणत्या दराने मिळतो हे देखील माहित होत नाही शिवाय अनेक वेळा सर्रास तांदूळ आणि गहू वाटप होतो ,मात्र अंगठा हा डाळी सह साखरेचा माला चाही असतो.त्यामुळे यात पारदर्शकता आणायची असेल तर पावती देणे बंधनकारक करावे ,पावतीसाह धान्य देऊन मगच अंगठे घ्यावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले . येणाऱ्या महिन्यांपासून याची अमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देखील देण्यात आला.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पंकज चव्हाण,शुभम तातुदे,धनंजय गोंदवले, अनंत डोके, अशोक माने, मयुर पवार,समाधान चव्हाण उल्हास लाखे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!