AgricultureBreaking News

राष्ट्रीय नेते मा.खा.शरद पवार साहेबांनी दुध,कापुस,सोयाबीन,केळी,कांदा, यांच्या दराचा प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्न करावा – श्री.भिमराव भुसनर अध्यक्ष – हटकर समाज संघटना

पंढरपूर/नामदेव लकडे – महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजा खुप संकटात सापडला आहे.एक तर शेतमालाला योग्य भाव नाही.जे पण शेतात लावले त्याला दर नाही.खुप निराश अवस्थेत शेतकरी बळीराजा सापडला आहे. दुसरीकडे सरकारने कर्ज माफी केली पण बँकेचे अधिकारी नवीन कर्ज देण्यासाठी जाचक अटी घालत आहे. दहा पैकी एक किंवा दोघांना तोंड बघुन कर्ज देत आहेत.केळी लागवडी केल्या कोरोनाचे कारण करुन एक ते दोन रुपये किलो ने खरेदी केली.त्यावेळी सरकारने कडक पावले उचलाय पाहिजे होती पण तसं घडले नाही.मग शंका येते की हे सरकार नेमके कुणासाठी काम करते.तेच मका,सोयाबीन,कांदा,यांच्या बाबतीत पण हेच झाले म्हणून सरकारला विनंती करतो कि एकदा हमीभाव ठरवल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजा चांगले दिवस येणार नाहीत.
शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेतकरी दुधाचा व्यवसाय करतो.भाजप सरकारने  30 रुपये पेक्षा जास्त दर दिला आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे.मग शेतकरी राजावर का अन्याय होतोय.दुधाला 30 रुपये हमी भाव ठरवा.ऊसाला 3500/ कापुस7000/ सोयाबीन5000/हमीभाव द्या.कापुस,सोयाबीन हे मराठवाडय़ातील प्रमुख पिकं आहेत त्यांना पण हमीभाव मिळाला पाहिजे. इतर पिकांना हमीभाव द्या.अन्यथा महाराष्ट्रात हटकर समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येतील.काही घटना घडल्यास सरकार जबाबदार राहिल.अशी विनंती अध्यक्ष  श्री.भिमराव भुसनर यांनी केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!