राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न


सोलापूर- १० जून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला . 


यावेळी कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार ,  सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी ईनामदार, ज्येष्ठ नेते बशीर शेख, दिलीप कोल्हे, जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, प्रदेश सचिव शंकर पाटील, महिला निरीक्षक सौ दिपाली पांढरे, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, उपाध्यक्ष मनीषा माने, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, युवती शहराध्यक्ष आरती हुळले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांचेसह पक्षाचे सर्व फ्रंटल आणि सेलचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण 


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरण जागर या उपक्रमा अंतर्गत या जून महिन्यात संपूर्ण शहरात करण्यात येणाऱ्या १००० वृक्ष लागवड संकल्पनेच्या अनुषंगाने आज प्रातिनिधिक स्वरूपात साईदिप नगर (कै.सुभद्राई जाधव मंगल कार्यालय राजस्व नगर रस्ता परिसर) येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते – माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, पर्यावरण विभाग शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी बाळासाहेब मोरे व त्या भागातील प्रतिष्ठित नागरिक विलास आसबे, श्रीकांत जाधव, संतोष गायकवाड, गणेश पवार, निळोबा जाधव, अरुण जाधव, विकास जाधव हे उपस्थित होते.

Leave a Reply