राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार पक्षी सप्ताह: निबंध, चित्रकला, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

 

सोलापूर,दि.30: पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर,पक्षी संरक्षण आणि संवर्धन कायदा अशा पक्ष्याबांबत बहुविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

 जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सलिम अली आणि साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी  मारुती चित्तमपल्ली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून पक्षी सप्ताह आयोजित करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.त्याबाबतचा शासन निर्णयही नुकताच जारी करण्यात आला आहे. यानुसार सोलापुरात पक्षी संवर्धन कार्यशाळा, चित्रकला निबंध स्पर्धा, पक्षी निरीक्षक कार्यक्रम, पक्षी अधिवास स्वच्छता असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे श्री.धैर्यशील पाटील यांनी सांगितले.  पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाच्या दृष्टीने जलसंपदा,कृषि, पोलीस या विभागांची मदत घेण्यात यावी, असे ही शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 पक्षी सप्ताहानिमित्त सोलापुरात आयोजित कार्यक्रम – (तारीख, कार्यक्रम)

  दि. 5 नोव्हेंबर अरण्यऋषी कक्षाचे उद्घाटन, 6 नोव्हेंबर JFM अंतर्गत जनजागृती कार्यक्रम, 7 नोव्हेंबर पांढरी ता. बार्शी येथे पक्षी संरक्षण व संवर्धन कार्यशाळा, 8नोव्हेंबर चित्रकला, निबंध स्पर्धा, 9 नोव्हेंबर नान्नज येथे पक्षी निरीक्षण कार्यक्रम, 10 नोव्हेंबर सिद्धेश्वर वन विहार, सोलापूर येथे पक्षी अधिवास स्वच्छता, 11 नोव्हेंबर सिद्धेश्वर वन विहार येथे पक्षी छायाचित्र प्रदर्शन, 12 नोव्हेंबर सिद्धेश्वर वन विहार येथे बक्षीस समारंभ व समारोप कार्यक्रम.

   निबंध स्पर्धेसाठी 1) वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे 2) जर पक्षी नसते तर 3) निसर्ग माझा सोबती असे विषय आहेत. या विषयावर 7 नोव्हेंबर पर्यंत 500 शब्दातील हस्तलिखीत निबंध लिहून, [email protected] या मेलवर पाठवावा किंवा श्री.ए.एन.खंडाळे (7038669032) यांना व्हॉट्सअप वर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply