Education

राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या  व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एकरकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परीक्षेपूर्वी भरायची सवलत दिली आहे. विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीची बैठक होऊन त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याचा ठराव करण्यात आला.

कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या आपत्तीमुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत कृषिमंत्र्यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिष्ठाता यांना निर्देश दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!