Headlines

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान – अश्विनी महांगडे

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना पोलिसांचा सन्मान करण्याचे पत्र देताना रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे, संतोष पवार, परवेझ लाड आदि…

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार

सातारा /विशेष प्रतिनिधी-कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल म्हणून ओळखले जात आहे. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींना “पोलिसमॅन ऑफ द मंथ” हा पुरस्कार देऊन पोलीस विभागाच्या वतीने गौरविले जाते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे पत्र प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना भेटून दिले आहे.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. 

पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य मधील सर्व सदस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या “पोलिसमॅन ऑफ द मंथ” या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तसेच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीही प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *