युवा कीर्तनकार अविनाश भारतीयांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धा संपन्न

प्रतींनिधी /रविशंकर जमदाडे – महाराष्ट्राचे ख्यातनाम युवाकीर्तनकार, कवी,वक्ते अविनाश भारती यांच्या वाढदिवसानिमित्त कवी-लेखक-वक्ते समूहातर्फे १ ऑक्टोबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लॉकडाऊनच्या काळात कवी/कवीयित्रीचे विचार लॉकडाऊन होता कामा नयेत,त्यांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हाव, नवोदीत कवी कवयित्रींनी सामाजिक विषयांवर आपल्या भावना व्यक्त कराव्यात हा स्पर्धेच्या आयोजना मागचा हेतू होता.या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.९८ कवींनी यात सहभाग घेतला होता.मुख्य आयोजक मंगेश देवकांबळे नांदेड तसेच आकाश गजभिये, धर्मराज भोजणे, सचिन बिजले, आकाश बनसोडे, सुभाष उमरकर यां सर्वांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन-नियोजन केले होते.स्पर्धेला देण्यात आलेले विषय ही सामाजिक आशयाचे होते.महिला सुरक्षा, भारतीय लोकशाही पुढील आव्हाने, आजचा युवक या विषयांवर आधारित कविता स्पर्धेत वाचायला मिळाल्या.

अनेक कवींनी आपल्या हातातल्या लेखनीच्या बळावर अन् कवितेच्या माध्यमातून महिलांच्या असुरक्षेवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर तसेच भारतीय लोकशाही समोर आव्हानांवर आपली परखड भूमिका कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली.कविता हे परिवर्तनाचे एक माध्यम आहे कवितेतून क्रांती होऊ शकते आणि ती क्रांती; ते जन प्रबोधन व्हावे या उद्दिष्टाने स्पर्धेचे आयोजन युवापिढी करून करण्यात आले होते.चंद्रपूर, आकोला, पुणे,नंदूरबार,मुंबई,नांदेड, अमरावती, नाशिक महाराष्ट्राचे उर्वरित सर्वच जिल्हे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून ही काही कवींनी या स्पर्धेसाठी रचना पाठवली होती.या स्पर्धेचे परिक्षण प्रा.डॉ.कविता सोनकांबळे, प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले सर, प्रा.महादेव लुले सर या तज्ञ मार्गदर्शकांनी केले.या स्पर्धेचे आकर्षण ठरले ते स्पर्धकांना उत्तेजीत करण्यासाठी स्वत: अविनाश भारती सरांनी स्पर्धकांना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.आयोजकांचे आभार मानले.हातांना लिहते करा असा संदेश दिला.त्यांचे गुरू नारायण पुरी यांच्या कवितेच्या ओळी त्यांनी सर्वांसमोर ठेवल्या.नारायण पुरी आपल्या कवितेत अस लिहितात,”मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगाला पाहण्यास दृष्टी देतो आहे”

स्पर्धकांनी पाठवलेल्या रचना इतक्या उत्तम होत्या की त्यातून एखाद्या कवितेला दुसऱ्या कवितेपेक्षा श्रेष्ठ ठरवणे परीक्षकांसाठी अवघड होते.निकाल ठरलेल्या वेळी आयोजकांकडून लावण्यात आला.या स्पर्धेतदिनेश मोहरील अकोला ,संदेश क्षिरसागर,स्मितल सुरेश देवरे धुळे यांना प्रथम तर जगदीश्वर मारोती मूनघाटे चंद्रपूर, कु. विवेक मधुकर वारभुवन नवी मुंबई,स्नेहा कवडूजी खडसे वर्धा यांच्या रचनांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.डॉ. स्वाती भद्रे , नांदेड,छाया सुरेशराव बोहरूपी , अमरावती , सौरभ हिरामन आहेर, तिसगाव, नाशिक यांच्या रचनांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.एकंदरीत महामारीच्या काळात ही स्पर्धेला मिळालेला प्रचंड मोठा प्रतिसाद आणि सर्वांच्या उत्तमोत्तम रचना वाचून स्पर्धेमागचे उद्दिष्ट सफल झाले याचे समाधान स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश देवकांबळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply