युरिया थेट शेतकर्‍यांच्या बांधावर , रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल

माढा / राजकुमार माने – रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने उंदरगाव मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर युरीया खत पोहोच करण्यात आले. लॉक डाउन च्या काळात शेतकरी उध्वस्त झालेला असताना आता त्याला युरीया साठी दिवसदिवस रस्त्यावर रांगेत उभे राहावे लागत आहे. म्हणून रयत क्रांती संघटना माढा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्याची विनंती तालुका कृषी अधिकारी यांना निवेदना द्वारे करण्यात आली होती. त्याच्या अनुषंगाने आज उंदरगाव मध्ये 10 टन युरीया खताचे वाटप करण्यात आले . सर्वसामान्य लोकांना , शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना कायम कार्यरत आहे. यापुढेही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सतत कार्यरत राहील. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणी त त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके यांनी व्यक्त केले.त्याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके, संतोष कोळी, अमोल तांबीले सर , गणेश सुतार औदुंबर लवटे, नितीन चव्हाण, सागर चव्हाण, धीरज भांगे , नितीन( रंगा )चव्हाण, विठ्ठल वाघमारे आदी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply