Headlines

मेरा रेशन मोबाईल अ‍ॅपची सुरुवात


नवी दिल्‍ली– ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी आज “वन नेशन वन रेशन कार्ड” (ओएनओआरसी) योजनेवरील पत्रकार परिषदेत भाषण केले. यावेळी सचिवांनी मेरा रेशन मोबाइल अ‍ॅपचे देखील उदघाटन केले. या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या रेशनकार्ड धारकांना होईल.

या प्रसंगी माध्यमांना माहिती देताना पांडे म्हणाले की, ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवातीला 4 राज्यांत सुरू करण्यात आलेली यंत्रणा अल्पावधीतच म्हणजे डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आणि येत्या काही महिन्यातच उर्वरित 4 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (आसाम, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल) एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पांडे यांनी माहिती दिली की सध्या या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी एनएफएसए अर्थात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86% एनएफएसए लोकसंख्या) आहेत आणि एक राष्ट्र एक रेशन कार्डच्या अंतर्गत महिना सरासरी 1.5 ते 1.6 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार नोंदवले जात आहेत.

कोविड -19 महामारीच्या काळात प्रत्येक एनएफएसए लाभार्थीसाठी विशेषतः स्थलांतरितांसाठी ओएनओआरसी ही एक मूल्यवर्धित सेवा असल्याचे सिद्ध झाले आहे असे पांडे यांनी सांगितले.

परप्रांतीय एनएफएसए लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भात ते म्हणाले की, विभाग इतर मंत्रालये / विभागांशी सातत्याने सहकार्य करीत आहे. ते म्हणाले की ओएनआरओसी प्रणालीमध्ये स्थलांतरितांच्या पोर्टलचे एकत्रीकरण कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या पाठिंब्याने केले जात आहे. यात ओएनओआरसीला गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पीएम स्वनिधी कार्यक्रमाचा भाग बनविण्यात आले आहे, भारतीय रेल्वेच्या श्रमिक विशेष सह रेल्वेने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांसाठी जागरूकता मोहीम (रेल्वे स्थानकांवर घोषणा व दृक-श्राव्य प्रदर्शन) आणि आयइसी/ क्रिएटिव्ह चा विकास तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पीआयबी, माय गव्ह, ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन द्वारे माध्यम प्रसिद्धी यांचा यात समावेश आहे.


देशभरातील 2,400 हून अधिक रेल्वे स्थानकांवर आणि रेडिओ स्पॉट्सच्या माध्यमातून हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे.


अँप्प डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://bit.ly/2OT9i4c

Leave a Reply