मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सुदर्शन न्युज वर कारवाई करण्याची मागणी

उस्मानाबाद – मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बदल तसेच समाजामध्ये तेढ निर्माण केले  म्हणून सुदर्शन टीव्ही व त्याच्या संपादकवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मौलाना जाफरअली खान पठाण यांनी केली.

सविस्तर वृत पुढीलप्रमाणे सुदर्शन न्युज चॅनेल मध्ये दिनांक 13/5/2021 रोजी बिनधास्त बोल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक व सुदर्शन न्युज चॅनेल चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी बिंदास बोल या कार्यक्रमांमधून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची मदिना शहर सौदी अरेबिया येथे स्थित असलेली मस्जीद व मझार  मुस्लीम धर्मीयांचे दुसरे सर्वात मोठे धार्मिक पवित्र स्थान आहे.ते मिसाईल रॉकेटच्या सहाय्याने नष्ट केले जात असल्याचे ॲनिमेतेड दृश्य दाखवून आम्हा मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला . म्हणून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी  मागणी मौलाना जफरअली खान मोहम्मदअली खान पठाण यांनी पोलीस निरीक्षक , शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply