मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापनेच्या निधीसाठी मिरजेमध्ये बैठक

 

सांगली/सुहेल सय्यद

     महाराष्ट्रामध्ये मुस्लिम युनिव्हर्सिटी निर्माण हुमायून मुरसल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नेतून कोल्हापूर जिल्ह्यात हेरले गावी होत आहे. या युनिव्हर्सिटी निर्मितीच्या निधीसाठी ॲड अब्दुल जब्बार मुरसर, शाही ईदगाह जामा मस्जिद इतजाम कमिटीचे अध्यक्ष महबूबआली मनेर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेतील मनेर कॉम्प्लेक्स मध्ये बैठक पार पडली.

     यामध्ये मिरजे मधील विविध सामाजिक, राजकीय कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीतून, मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या निर्मितीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावावा, यासाठी मिरज भागातून निधी गोळा करून देण्यात येणार आहे. 

     यावेळी ॲड अब्दुल जब्बार मुरसल म्हणाले, मुस्लिम समाज हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आहे. जो पर्यंत मुस्लिम समाज हा शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत नाही. तो पर्यंत त्याचा मागासलेपणा दूर होणार नाही. यासाठी मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापना होणे गरजेचे आहे.

     महबूबआली मनेर म्हणाले, मुस्लिम समाजाची शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी समाजातील शिकलेल्या लोकांनी आर्थिक वर सामाजिक मदतीसाठी पुढे आले पाहिजे. आपली शैक्षणिक परिस्थिती सुधारून भारताच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे. मुस्लिम समाजाला विकासासाठी निधि मिळत नाही, बँक कर्ज पुरवठा करत नाही. शैक्षणीक सुधारण्यासाठी युनिव्हर्सिटी स्थापना होणे गरजेचे आहे. या युनिव्हर्सिटी समाजातील मुस्लिम समाजाबरोबर सर्व जातीधर्माच्या गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी समाजातील विविध सर्व स्तरातील लोकांनी मदत करावी. असे सांगितले.

     यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे, शमशुद्दीन तोरीवाले, प्रकाश बनसोडे, खलील मालगावी, अमनगरचे अध्यक्ष हबीब भाई मुल्ला, विजय मगदूम, मुस्ताक पठाण, नजर हुसेन जारी, इनुसभाई चाबुकस्वार, शौकत मुजावर, आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply