मुस्लिम मुलांकडुन दहा वर्षापासुन गणेश प्रतिष्ठापना , कुंटुंबियाचाही सहभाग

अक्कलकोट/ जयकुमार सोनकांबळे :- खैराट येथील एक मुस्लीम धर्मीय मुलगा गेल्या दहा वर्षापासुन घरात गणपती बसवत असुन विविधत पुजा अर्चा करून विधिवत मिरवणुक काढुन विसर्जन करत असुन हिंदु मुस्लिम भाऊबंदकीचा आदर्श सर्वासमोर ठेवला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.जहिर हुसेन बिराजदार (रा.खैराट )असे या मुलाचे नांव असुन तो इयत्ता आठवीत आहे. बालवाडीत असल्यापासुन वयाच्या चौथ्या वर्षापासुन जहिर बाप्पाचे आकर्षक असुन तेव्हापासून सलग दहा वर्षे झाले तो विधिवत गणेश मुर्तीची स्थापना करून सकाळ संध्याकाळ आरती करतो.या गणेश पुजनच्या वेळी त्याचे शेजारचे मित्रमंडळीही हजेरी लावतात.या लहान मुलाचे आदर्श घेऊन आपण एकमेकांचे सण उत्सव साजरे करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. व जगात सर्वशेष्ठ आहे अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल हुसेन बिराजदार यांनी व्यक्त केली. आम्ही कुंटुंबीयही याला सहकार्य करतो असे सांगितले.मुलाचे आजी आजोबा स्वतः सर्व धर्म समभाव मानणारे असुन तेही याला विरोध करत नाहीत.बिराजदार कुंटुंबीय सगळेच या उत्सवात सहभागी होतात.जहिरचे दोन मोठे बंधुसह चुलत बहिण भाऊही या गणेश उत्सवात सहभागी होतात.जहिर नित्यनियमाने नमाज पठणासाठी मशिदीतही जात असुन इतरही सर्व सण उत्सवात तो उत्साहाने सहभागी होतो.जहिरचे आजी आजोबा स्वतः श्रीशैलला जाऊन आले आहेत.या कुंटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply