Breaking Newsyuva sanvaad

माणूस म्हणून जग माणसा…..

माणूस म्हणून जग माणसा, जिवन खूप लहान आहे….
सर्वांशी प्रेमाने वाग माणसा, आयुष्य खूप छान आहे…
बनू नकोस अहंकारी, अहंकार तुझा घात आहे….
नम्रतेने वाग माणसा, ही तर तुझी जात आहे…
कपटी पणाने वागू नकोस, यांतच तू लहान आहे…
ठेव तुझे मन स्वच्छ, यातच तू महान आहे..
सर्व विश्ववाटले जरी वाईट, धीर तू सोडू नकोस….
तुझ्यातला आंतरआत्म्याला वाईट मार्गाला ओढू नको…
चंदनासारखं आयुष्य तुझं, चांगल्या कामात झिजव तू..
कोणाचीही इर्षा न करता,प्रेम, आशीर्वाद कमव तू…
आयुष्याच्या वाटेवर चांगले काम करत रहा..
तू असताना वतू नसताना तुझी छाप सोडून जा,तुझी छाप सोडून जा….
कवी किरण साळुंखे
राज्यशास्त्र विभाग
                                  श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयबार्शी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!