Headlines

माणसाच्या रूपातील देवदूत : अंध जगन्नाथ भोसले यांच्या मदतीला धावले


सांगली/सुहेल सय्यद-सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये सिद्धेश्वर कॉलनीत मातीच्या छोट्याशा खोलीत राहत असलेल्या जगन्नाथचा (40) जन्मतःच एक डोळा नव्हता. वयाच्या पंधराव्या वर्षी खेळत असताना काठी लागून दुसरा डोळा पण निकामी झाला, वडिलांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. लगेच आईचे देखील आजाराने निधन झाले. दोन्ही डोळे निकामी असल्यामुळे, आई- वडील छत्र हरपले मुळे, पोटचा प्रश्न उभा राहिला, अश्या वेळी गल्लीतील मित्रांनी जेवणाच्या मेसचा खर्च भागवत आहेत. अश्या हलाखीच्या परिस्थितीत एकटेच जीवन जगत आहेत, जीवन जगत असताना एक अडचण दूर करे पर्यंत दुसरी अडचणी निर्माण होत होत्या, अश्यातच त्यांना रात्रंदिवस पोटात दुखणे व जेवल्यानंतर पोट फुगणे ह्या मुळे भरपूर वेदना होत असल्याने या विकाराने ग्रासले, त्यामुळे ते प्रचंड चिंताग्रस्त, भयभीत झाले होते. त्यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते त्यामुळे मला पण तेच झाले असेल या मानसिकतेच्या, शंकेने ते कायम भयभीत गप गप असायचे. सांगलीतील दोन चार हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले होते, पण काहीही फरक पडला नव्हता कोणी सांगितले.

हैदराबाद, मुंबईला घेऊन जावा, लाखाच्या घरात असलेला खर्च न पेलणारा होता, त्यातच कोरोना, लॉकडॉनमुळे जायचे जमले नव्हते. यावेळी शेजारी राहणारे सागर बाबर, गणेश जाधव, युवराज दुधे, राहुल गेंड, यांनी याची सर्व माहिती घेऊन तासगाव येथील रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला यांची भेट घेऊन जगन्नाथ भोसलेची कैफियत मांडली निसार मुल्ला ह्यांनी या आजाराची सर्व कागदपत्रे पाहून सांगली येथील त्यांचे मित्र डॉक्टर संस्कृती हॉस्पिटलचे पोटविकार तज्ञ डॉ. बसंत बुरले यांना सर्व उपचाराचे रिपोर्ट व्हाट्स ऍप वर पाठवुन दिले व या रुग्णाची हलाखीची परिस्तिथी विषयी सांगितली. त्यांनी लगेचच या रुग्णांला घेऊन या सांगितले, घेऊन गेले असता डॉक्टर सुधीर चौधरी यांच्याकडून सोनोग्राफी व अन्य तपासणी करून उपचार करत त्यांना औषधे दिली हे सर्व माणुसकीच्या नात्याने पूर्ण मोफत केले व त्यांचा हा आजारच पूर्णपणे बरा झाला ह्यामुळे जगन्नाथ भोसले यांची जगण्याची नवीन उमेद, उमंग निर्माण झाली आहे. कर्करोग झाले असेल ही शंका पण दूर झाली आता त्यांच्या चेहऱ्यावर तरतरी, उल्हासी आली आहे. निसार मुल्ला, डॉक्टर बसंत बुरले, डॉक्टर सुधीर चौधरी, सागर बाबर, गणेश जाधव, युवराज दुधे, राहुल गेंड यांच्या धडपडीला घेतलेल्या मेहनतीला एका चाळीस वर्षीय अंध असलेल्या जगन्नाथ भोसलेंच्या आयुष्यात जीवनात आनंद निर्माण झाला आहे.

यावेळी निसार मुल्ला म्हणाले, परमेश्वराने आमच्या हातून पुण्याईचे काम घेतले अंध असलेल्या जगन्नाथ भोसले यांना केलेली मदद याचे आम्हाला मानसिक समाधान मिळाले,जगन्नाथ भोसले यांच्या जीवनात देवाच्या रूपामध्ये देवदूत धाऊन आले.

Leave a Reply