Headlines

माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल कॉंग्रेस मध्ये प्रवेश


कोलकत्ता- माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी शनिवारी  तृणमूल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. यशवंत सिन्हा  हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रालयाच्या जबाबदारी त्यांनी निभावली होती.वाजपेयी सरकार च्या काळात सिन्हा यांनी विदेश मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. पार्टी सोबत असणार्‍या मतभेदामुळे त्यांनी 2018 साली भाजपा ला सोडचिठ्ठी दिली होती. 

यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हजारीबाग (झारखंड ) मधून भाजपा चे लोकसभा सदस्य आहेत. सिन्हा म्हणाले की देश अजब अशा परिस्थिति मधून जात आहे.आज आमची मूल्य  आणि तत्वे धोक्यात आहेत. लोकशाही मधील स्वायत्व संस्थाना कमकुवत केल जात आहे. 


सिन्हा यांनी भाजपा विरुद्धच्या लढाईत पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थन करण्याची शपथ घेतली. 

तृणमूल कॉंग्रेस चे नेते सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की सिन्हा यांचे आम्ही आमच्या पक्षात स्वागत करतो.त्यांच्या पक्षातील सहभागाने निवडणुकीतील भाजप विरोधी लढाईला बळ मिळेल. 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *