महिला अत्याचाराच्या घटना विरोधात भाजप आक्रमक

 

सिंदखेडराजा /बालाजी सोसे –  सध्याच्या  सरकारच्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न  गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्याचार , विनयभंग आणि हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच  कोरोना महामारी सारख्या  अतिशय संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर  अत्याचार आणि विनयभंग सत्र सुरूच आहे . .त्याकरिता आज सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर भाजप च्या वतीने मोर्चा काढून  निवेदन देण्यात आले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र मध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महा विकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार घटनेचा वाचा फो‌डण्यासाठी एक दिवस आंदोलन करण्यात आलेलं होतं परंतु तरीही महाविकास आघाडी सरकार कुठली दखल न घेतल्यामुळे व पाऊल न उचलल्यामुळे आज दिनांक १२/१०/२०२० रोजी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्रात  महिलांवर होणारे अत्याचारा विरोधात तसेच त्याच्या सुरक्षिते साठी कडक  कायदा करावा . अशी मागणी करण्यात आली . यावेळी  उपस्थिती सौ सुनीता ताई राजोते जिल्हा सचिव भाजपा महिला आघाडी मोर्चा,सौ अनिता शिगणे महिला मोर्चा ,सौ नंदाताई मेहेत्रे नगर उपाध्यक्ष,सौ शोभाताई काळे, सौ उज्वलाताई नागरे, सौ प्रियाताई केळकर व तसे प्रमुख उपस्थिती श्री मा तोतारामजी कायदे माजी आमदार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ श्री मा प्रभाकरजी मामा ताटे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, श्री विष्णूभाऊ मेहेत्रे ,श्री गजानन घुले भारतीय जनता पार्टी सिंदखेड राजा तालुकाधक्षकृा ,श्री कृष्णा काळे, श्री दीपक पडळकर कि राजा, श्री बाळासाहेब केळकर ,श्री युवराज नागरे , श्री सुभाषभाऊ मुंडे प चक्का, श्री सुंदरराव आढाव , श्री दिपक घुगे , श्री बंडू नागरे, श्री राजू गुंजाळ, आणि जावेदभाई  इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply