महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे 7 व्या वेतन आयोगासाठी मेल करण्याचे आंदोलन

बार्शी/प्रतिनिधी – आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय षिक्षकेतरांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी मेल करण्याचे अंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मेल मा. उदय सामंत, उच्च व तंत्र षिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. संचालक, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पूणे यांच्या शासकीय मेल आयडीवर केले जातील. या बाबत मा. मुख्यमंत्री यांना निवेदण मेल केले असता त्यांच्या कार्यालयाने कार्यवाहीसाठी पुढे पाठवत असल्याचे संघटनेस कळवले आहे. राज्यभरातील शिक्षेकतरांनी वरील कार्यालयांवर मेलचा पाउस पाडावा असे अवाहन करण्यात आले आहे. हे अंदोलन दिनांक 7 सप्टेंबर रोजी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी की, विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना 7 वा वेतन लागू केला गेला, परंतू 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चीती मध्ये आश्वासित प्रगती योजनेत काही ग्रेड पेचा समावेश असलेल्या स्केलला मान्यता दिली गेलेली नाही. त्यामूळे ऐंशी टक्के शिक्षकेतरांना 7 वा वेतन आयोगाचा फायदा झालेला नाही. वित्त विभागाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तरतुदी राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेत्तरांना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास वित्त विभागाची मान्यता नसल्याचे कारण देऊन उच्च तंत्र शिक्षण विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने तो शासन निर्णय रद्द केला. त्याचप्रमाणे एकाकी पदासाठीचा शासन निर्णय हि रद्द केला. शासन निर्णयांना वित्त विभागाची मान्यता घेण्याची जबाबदारी संबंधित पालक मंत्रालयाची असताना, वित्त मंत्रालयाची मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या तत्कालिन अधिकार्यांनी घेतली नाही त्यामुळे ते निर्णय उच्च्च शिक्षण विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करून समस्त शिक्षकेतरांना वेठीस धरले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णयांना वित्त विभागाकडून कार्योत्तर मंजूरी घेवून उच्च शिक्षण विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने ते शासन निर्णय आश्वासित प्रगती योजनेस लागू करून 7 वा वेतना आयोगाचा लाभ द्यावा अषी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉम्रेड प्रविण मस्तुद, आरती रावळे, उमेष मदने, विलास कोठावळे, हणुमंत कारमकर, हरिदास बागल या पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply