Breaking Newsyuva sanvaad

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्वकोश निर्मिती मंडळावर मुस्लिम मराठी साहित्यकांना घ्यावे

  


महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे नुकतेच गठण करण्यात आले व यात एक ही मुस्लीम साहित्यकाचा समावेश करण्यात आला नांही या मुळे साहित्य क्षेत्रात सरकाशी नाराजगी निर्माण झाली आहे कृपया ही नाराजगी लवकरात लवकर दूर करावी व मुस्लीम तथा अल्पसंख्याक. आदिवासी साहित्यकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी विनंती आहे. 


  महाराष्ट्रात अंदाजे २ कोटी मुस्लिम समाज आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी , बौद्धधर्मीय अल्पसंख्यांकही आहेत. दोन्ही संस्थाच्या कार्यकाळी मंडळात एकही मुस्लिम, ख्रिस्ती वा जैन धर्मीय सदस्य नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालया अंतर्गत या नियुक्त्या होतात. महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालया ने असा भेद-भाव कां केला ? असा प्रश्न निर्माण होतो

   

महाराष्ट्रतील मराठी भाषेवर फक्त एका धर्म विशेषाचीच मक्तेदारी आहे काय? इतर धर्मीयही साहित्यिक आहेत आणि तेही तितक्याच तन्मयतेने आणि अभिरुचीने मराठी साहित्य निर्मिती करीत आहेत. इतकेच नव्हे तर  महाराष्ट्रात १९९० साली सोलापूरात आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , व नंतर मुस्लिम मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीद्वारे गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले गेले आहेत  विशेष म्हणजे या साहित्य संमेलनांना शासनामार्फत कोणताही निधी दिला जात नाही. मुस्लिम मराठी साहित्यिक पदरमोड करून ही साहित्य संमेलने भरवतात व  यशस्वी करुन ही दाखविले आहे हे जग जाहिर आहे

  

आज महाराष्ट्र राज्यात एक हजार च्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक मराठी साहित्य सेवा करत मराठी साहित्यात मोलाचे योगदान देत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाने कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, गज़ल, बालसाहित्य, नाटक, वैचारिक लेखन अशा विविध ललित प्रकारात आपला  ठसा उमटवला आहे. यात प्रामुख्याने खलील मोमीन, डॉ अब्दुल आझम, प्रा फकरुद्दीन बेन्नूर,  डॉ शेख इक्बाल मिन्ने, ए के शेख, फ म शहाजिंदे,डॉ जुल्फि शेख, डॉ अजीज नदाफ, कासिदकार लतीफ नल्लामंदू प्रा मिर इस्हाक शेख , बशीर मुजावर, रफीक सुरज, डॉ अक्रम पठाण, प्रा फातिमा मुजावर, डॉ अलीम वकील, मुबारक शेख, डी के शेख, जावेदपाशा कुरेशी, सरफराज शेख,असिफ अन्सारी, फर्जाना डांगे,साबीर सोलापुरी, इरफान शेख, शफी बोल्डेकर, अॅङ हशम पटेल, डॉ. समीर इनामदार, डॉ इ जा तांबोळी , डॉ शकील शेख,  , अय्यूब नल्लामंदू , प्रा. एम. एम पठाण . सादिक इनामदार, डॉ नसीमा पठाण. अलताफ कडकाले , इलियास सिद्दीकी , डॉ समीना नदाफ , एम आय शेख  ,  नौशाद उस्मान, कवी डी.के शेख , डॉ बशारत , डॉ मिर्जा हाशम बेग , शाहजहान मगदूम , फेरोजा तस्बीह, नासिरोद्दीन आळंदकर, निजामोदीन शेख , जाकीर तांबोळी , शाहजहान तांबोळी , रब्बेसलाम शेख , रफीक काझी, कलीम अझीम, आय जी शेख, साहिल कबीर, मुहिब कादरी, जस्मीन शेख , दिलशाद शेख , इंतखाब फराश, प्रा  सलीम पठाण, परवीन कौसर , नसीम जमादार , निलोफर फणीबंद , अॅड़ शबाना मुललां,  हबीब भंडारी, शब्बीर मुलाणी , इक्बाल मुकादम, सय्यद मुजफ्फर या सारख्या साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणाला नाकारता येत नांही

  

असे असताना महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे गाठण होत असताना एकाही मुस्लिम साहित्यिकाची आठवण होऊ नये याचे नवल वाटते. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे आणि त्यांनाही याचा विसर पडावा ही शोकांतिका आहे. खरेतर ही मंडळे सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्याही समतोल राखणारी असावीत. 

                  

उर्दू मराठी साहित्य परिषद, व अभा मुस्लीम मराठी साहित्य., परिषद ,. याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करुन अशी मागणी शासन दरबारी  करीत आहे की मुस्लिम मराठी साहित्यिकांपैकी किमान ४ साहित्यिकांचा समावेश या दोन्ही मंडळात करावा आणि समान संधी उपलब्ध करून द्यावी. आणि इतर अल्पसंख्याक  म्हणजे ख्रिस्ती, जैन , बौद्ध व आदिवासी साहित्यिकांचाही या मध्ये समावेश व्हावा अशी मागणी उर्दू मराठी  मराठी साहित्य परिषद चे अध्यक्ष प्रा डॉ इक्बाल तांबोळी , प्रा पी पी कुलकर्णी . अय्यूब नल्लामंदू ,  मजहर अल्लोळी, जाफर बांगी ,सय्यद इक्बाल, डॉ शकील शेख, इलियास सिद्दीकी  यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , मा. उद्धवजी ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री मा अजित पवार साहेबांना मेल द्वारे केली आहे.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!