AarogyaBreaking Newscoronacovid19

महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार मोफत लस

 


मुंबई – राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे.त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी  यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.


केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ वयाहून कमी असलेल्यांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे.


दरम्यान कोविशिल्ड लस केंद्राला १५० रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देणार आहे. कोव्हॅक्सिनची किंमतसुद्धा ६०० रुपये राज्यांना आणि खासगी रुग्णालयांकरिता १२०० रुपये असणार आहे, असेही ना. नवाब मलिक यांनी सांगितले. 


मागच्या कॅबिनेटमध्ये या दरांबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होऊन राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कालच तसे जाहीर केले आहे, असेही ना. नवाब मलिक यांनी सांगितले.


दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचे सुतोवाच ना. नवाब मलिक यांनी केले.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!