मळेगाव येथे 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन

बार्शी/शुभम काशीद-मळेगाव ता.बार्शी येथे 26/11 मध्ये शहिद झालेल्या वीरांना श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगाव यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले,देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुबंई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यानी हल्ला केला या हल्ल्यामध्ये आपल्या अनेक वीर सुपुत्राना वीर मरण आले,या हल्यामुळे भारत देश हादरून गेला,तरी देखील आपले मुबंई पोलीस त्या दहशतवाद्या सोबत 3 दिवस झुंज देऊन लढाई आपण जिंकली,यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता तुकाराम ओबाळे साहेब यांनी एका दहशतवाद्यास जिवंत पकडले,परंतु त्या आतंकवाद्यावे ओबाळे साहेबाना गोळ्या घातल्या व त्यांना वीर मरण आले,या सर्व वीर सुपुत्राचे स्मरण रहावे म्हणून विरांच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक प्रल्हाद दळवी यांच्या शुभहस्ते करून अभिवादन करण्यात आले,यावेळी माजी ग्रा.प.सदस्य नितीन पवार व अशोक माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,माजी ग्रा.प.सदस्य नितीन पवार,सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी,धनगर समाज सेवा संस्था बार्शी तालुका अध्यक्ष सागर शेळके,ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे,वालचंद जगताप,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply