AarogyabarshiBreaking News

मळेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

बार्शी प्रतिनिधी -मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला/क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,कोरोना महामारीच्या काळात राज्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्णांनाच्या नातेवाईक यांना रक्त मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, गेल्या वर्षी देखील महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत.मंडळाच्या वतीने शंभर बाटल्या रक्त संकलन केले होते, श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू वीस व्यक्तींना देखील एक वर्षांपासून नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे, यापूर्वी देखील मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत,या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी सरपंच संजयकुमार माळी,माजी सरपंच गुणवंत मुंढे,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,उपसरपंच धीरज वाघ,ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,यशदाचे शिवाजीराव पवार ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे,दशरथ इंगोले,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,माळी सेवा संघाचे संपर्क प्रमुख कल्याण माळी,माजी ग्रा.प.सदस्य संदीप विटकर,अन्नपूर्णा योजनेचे सचिव यशवंत गाडे,मंडळाचे दीपक निंबाळकर,भारत गाडे,संजय माळी,सचिन कानडे,रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते, या रक्तदान शिबिरामध्ये 77 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!