Headlines

मळेगाव येथे आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

                                      मळेगाव ता.बार्शी येथील  ध्वजारोहण उत्साहात संपन्न 

बार्शी/आसिफ मुलाणी – आपल्या देशामध्ये व राज्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आपल्या व कुटूंबाच्या जीवाची पर्वा न करता मळेगाव या गावाला कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोविड योद्धा आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर याच्या शुभहस्ते गावातील ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावचे सरपंच गुणवंत मुंढे यांनी  घेतला अशी माहिती अशोक माळी यांनी दिली.कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील प्रशासन गेल्या 5 महिन्यापासून डोळ्यात तेल घालून काम करीत आहे.बार्शी तालुक्यातील बहुतांश गावे कोरोना मुक्त आहेत व मळेगाव देखील आज कोरोना मुक्त झाले आहे.आजचे ध्वजारोहण सर्व प्रथम श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या घरासमोरील ध्वजारोहण प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका,आम्रपाली बनसोडे,मळेगाव ग्रामपंचायत चे ध्वजारोहण आशा वर्कर पूजा बोधले,जि.प.प्रा.शाळेचे ध्वजारोहण अश्विनी नलावडे,सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मळेगाव येथील ध्वजारोहण रूपाली तट व शहीद स्मारक येथील ध्वजारोहण बार्शी पोलीस स्टेशनचे संताजी आलाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले, व 15 ऑगस्ट चे औचित्य गावतलावजवळ वृक्षारोपण माजी सुभेदार हरिश्चंद्र नलावडे,व माजी सैनिक प्रल्हाद दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मळेगावचे सरपंच गुणवंत मुढे,माजी सभापती गंगुताई माळी,माजी सरपंच सिद्धेश्वर मुबरें,ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड,तलाठी गणेश राजे,माजी सरपंच संतोष निंबाळकर,मुख्याध्यापक लक्ष्मीकांत दीक्षित,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,शिक्षक विठ्ठल कोकरे,प्रा.संजय माळी,ग्रा.प.सदस्य संदीप विटकर,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,बँकेचे शाखाधिकारी महेश शेटे,मंडळाचे गिरीश माळी,धीरज वाघ,आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *